पान:भारतीय चलनपद्धती.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रस्तावना.

-:*२:*-

 राष्ट्राच्या चलनपद्धतीकडे सामान्य जनतेचें लक्ष जात नाही याचें मुख्य कारण तिचा व्यक्तीच्या रोजच्या व्यवहाराशी आणि समाजाच्या हिताहिताश निकट संबंध आहे, ह्या ज्ञानाचा पूर्ण अभाव होय. रुपये, चलनी नोटा, पावल्या, चवल्या वगैरे किरकोळ नाणी ह्यांची देवघेव अप्रतिहत रीतीने चालली असतांन नाणीं कोण पाडतो, त्यांची किंमत कशी ठरविली जाते, परराष्ट्राशी होणान्या व्यापारी व्यवहारांत त्यांचा विनिमय कसा होतो वगैरे प्रश्न उपस्थित होण्यास अवकाशच नसतो. सूर्य रोज उगवतो आणि मावळतो व त्यासंबंधानें ज्योतिष- शास्त्रविषयक चौकशी करण्याचें कोणाच्याही मनांत येत नाहीं; त्याचप्रमाणे राष्ट्रीय चलनपद्धतीची गोष्ट आहे. परंतु रोजच्या व्यवहारांत नाण्यांच्या बाबतींत कांही विशेष अडचण भासूं लागली म्हणजे सदरहु विषयाकडे लोकांचे लक्ष वेधर्ते आणि असे कां होतें? ' हा प्रश्न विचारण्याची प्रवृत्ति सामान्य माणसांतही दिसून येते. सूर्यग्रहणाची मीमांसा राहू-केतूंच्या पौराणिक गोष्टीनें लायांत येऊन तिनं जसें अज्ञ लोकांचे समाधान होतें, तसाच प्रकार चलनपद्धतीसंबंधानें ही कमी अधिक प्रमाणांत होतो व त्यामुळे जागृत झालेली जिज्ञासा पुनः सुप्त होतें. ज्योतिषाचें ज्ञान लोकांस होगें अवश्यक आहे, त्याहीपेक्षां चलनपद्धती. विषयों शास्त्रीय माहिती त्यांस उपलब्ध होणे जास्त अगत्याचे आहे. राष्ट्रीय चलनपद्धति सदोष असल्यास त्याचे दुष्परिणाम सर्व जनतेस प्रत्यक्ष किंवा अप्र- त्यक्ष रीतीनें भोगावे लागतात. ह्याकरितां त्या पद्धतीमधील दोष दाखवूनच ते सरकाराकडून नाहींसे करून घेणे हें लोकांचें एक महत्त्वाचे कर्तव्य होऊन जातें.

 युद्ध चालू असतांना नाण्यांची चणचण झाली व चलनी नोटांचा सुकाळ झाला. नोटांचे रुपये मिळण्यास पंचाईत पडून त्यासाठी बट्टा देण्याची जरूर भासूं लागली. नाण्याच्या बाबतीत सरकारास कडक निर्बंध करावे लागले व हिंदी चलनपद्धति सुयंत्र चालेनाशी झाली. पुढे सरकारनें सॉव्हरिनची किंमत पूर्वी १५ रुपये होती ती बदलून १० रुपये काययानें केली. परंतु आजमितीसहि