पान:भारतीय चलनपद्धती.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चलनी नोटाविषयीं सामान्य विचार.

२९


मिळणार असल्यामुळे त्या हुंडीचा भाव अर्थातच चढू लागेल. शेवटली खूण म्हणजे मालाच्या किंमती वाढू लागतात. नोटांची किंमत जर फार उतरली नसेल तर ह्या किंमती वाढणार नाहीत; पण ही किमत जर शेकडा १० ह्या प्रभाणांत उतरूं लागली तर व्यापारी वर्ग व माल उत्पन्न करणारे लोक हटकून किंमती वाढ वेतील. एवढेच नव्हे तर एकदा किंमती चढल्यावर त्या उतरूं नयेत म्हगून ते अटोकाट प्रयत्न करतील व सरकारने जर ह्या कागदी नोटा प्रचःरांतून नाहीशा करण्याचा निश्वय केला तर हेच व्यापारी त्या सरकारला विरोध करतील.

( २०) ज्या नोटाबद्दल मोबदला नाणी मिळतात अशा चलनी नोटाः - आतांपर्यंत ज्या नोटांबद्दल मोबदला नाणी मिळत नाहीत अशा नोटां- बद्दल आग्ण विचार केला. पण आपण आतां दुसन्या प्रकारच्या नोटांबद्दल विवेचन करूं. ह्या नोटांचा हा विशेष आहे कीं, जा कोगी ह्या नोटा प्रचारात आणी त्याच्यावर त्या नोटा परत आल्या असतां त्या आणून देणा-याला रोख न देण्याची जबाबदारी आहे. ह्या निषेधाचा असा फयदा होतो की, मागें सांगितलेले चलनी नोटांचे दोष टळून त्यांचे फायदे मात्र आपगांस मिळतात. हे फायदे काय आहेत त्यांचे वर्णन एकदां आलेलेच आहे. त्यामुळे द्विरुक्तीचा दोष आम्ही घेत नाहीं.

 ह्या नोटा देशांतील पेढ्यांना किंवा सरकारला काढितां येतात. आपणांला सरकारच्या धोरणाशी विशेष कर्तव्य असल्यामुळे आपण पेढ्यांनों काढलेल्या नोटांचा विचार बाजूस ठेवूं. सरकार ज्यावेळ अश नोटा काढीत असतें त्यावेळी ते ह्या नोटांच्या किंमतीचें सोनचांदी बाजूला काढून ठेवीत असते किंवा कधी कधीं नोटांच्या किंमतीइतकी रकम बाजूला काढून न ठेवतां कांहीं थोड़ी रकम अलग काढून ह्या नोटांचा प्रसार आपल्या पनीवरच करीत असते; पण लोकांची मात्र अशी खात्री असते की, आपग जर आ त्या नोटा ख जेन्यांत घेऊन गेलो तर त्या नोटामोबदला आपणांस रेख नागें खास मिळेल. सरकारचीही अशो खात्री असते कीं, आपली पत असल्यामुळे सगळेच लोक एकाच वेळी आपल्या नोटा घेऊन रोख रकमेवी मागणी करणार नाहीत.