पान:भारतीय चलनपद्धती.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८
भारतीय चलनपद्धति.


तल्या कनिष्ट वर्गाचे अतोनात नुकसान होतें. राष्ट्राची व व्यक्तीची पत नाहींशी होऊन खे ट्या नोटा पाडण्यासारख्या गुन्ह्यांकडे त्याची प्रवृत्ति होते; व सर्वोत मोठे नुकसान म्हणजे वरतूंच्या किंमतीत स्थिरता नसल्यामुळे सट्टेबाजीला ऊत येऊं लागतो व उद्योगधंदे बुडूं लागतात.

 पण आतां असा प्रश्न उद्भवतो कीं, कागदी नोटा फाजील प्रमाणांत काढस्या गेल्या आहेत हे समजावयाचे कसे ? एखाद्या सरकारला योग्य प्रमाणांत नोटा काढण्याची जरूर वाटली व तशा नोटा काढीत असतंना आपण फाजील प्रमाणांत नोटा काढू लागलों आहोत हें सरकारनें कसे ओळखावें ! सुदैवाने अशी परिस्थिति ओळखण्यास बांहीं अनुकूल साधने आहेत. बागदी नोटा वाजवीपेक्षा जास्त प्रमाणांत काढल्या गेल्या आहेत हे ओळखण्याची पहिली खूण अशी आहे कीं, ह्या नोटांची किंमत व्यवहारांत उतरूं लागते व सोन्या- चांदीची किंमत अधिक होऊ लागते. कारण पेढीवाले लोक व इतर व्यापारी परदेशी पाटविण्यास सोने चांदी जमवूं लागतात व प्रसंगविशेष जास्त किंमत देऊं लागतात.

 दुसरी खूण अशी की, प्रेशामच्या नियमाला अनुसरून घातूची नाणी अदृश्य होऊं लागतात. हा अनुभव सार्वत्रिक आहे. ज्या ज्या ठिकाणी नोटांचा 'फार्जल प्रमाणांत सुवाळ होऊं लागते त्या त्या ठिकाणी सोन्याचांदीच्या खाणी असलेत्या दक्षिण अमेरिकेतसुद्धा नाण्यांची पळापळ सुरू होते.

 तिसरी खूण अशी की, परदेशांवर वाढलेल्या हुंड्याचा भाव चढू लागतो. आपला असा अनुभव आहे, कीं, ज्या हुंड्याची किंमत परदेशांत मिळात्रयाची असते त्या हुंड्या कांहीं ठराविक हुंडणावळीच्या दराने सोन्याचांदीत विकल्या जातात, किंवा खरेदी केल्या जातात. हा व्यवहार सर्व सुधारलेल्या देशांत व्यापाराच्या मुख्य मुख्य शहरों नेहमी चाललेला असतो. अतां अशी कल्पना करूं कीं, ह्या देशांत चलनी नोटा बोकाळल्या आहेत व त्यांची किंमत उतरलेली आहे. विलायतेच्या व्यापायाने येथे कांहीं माल खरेदी केल्यावर येथील व्यापा- व्याने जर त्या विलायतेच्या व्यापन्यावर हुंडी काढली तर त्या हुंडीबद्दल सोनें