पान:भारतीय चलनपद्धती.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चलनी नोटाविषयी सायान्य विचार.

२७


नाणी अदृश्य होणार नाहीत. अशा रीतीने नःणी सदृश्य होऊं लागून अशी एक वेळ प्राप्त होईल की, त्या वेळी देशांत नुसत्या चलनी नोटाच राहतील. अशी परिस्थिति प्राप्त झाला असतांना सरकारने जास्त नोटा प्रचारांत आण- ण्याचा जर प्रपश्न केला तर मात्र लोकांचे खरेखुरे नुकसान होऊ लागतें. कागदी नोटांना बाहेर कुलामुद्धां विवारीत नाही. नोटांच्या किमती उतरू ला लागल्यामुळे पूर्वीचे ऋणको व घनको त्यांमध्ये झालेले करा डळमळू लागतात. च पुढे होणारे करार कोणीं करूं इच्छित नाहीं. इतकेच नव्हे तर ह्या नोटांची किंमत कमी झाल्यामुळे व्या गरी वर्गाला व नोकरीस ठेवणारे गिरण्यांचे मालक. त्यांना गरीब मजुरांना चागलेच नागरितां येतें; करण नोटांच्या किंमती उतर ल्यामुळे पूर्वी ज्या मालाला १०० रुपये पडत असत त्या मलावर ते उतरलेल्या किंमतीइतकी जास्त किंमत आकारणार व मजुगंस मात्र पूर्वीचाच ठराविक पवार देगार; व जरी मजूरांच्या आग्रहामुळे त्यांना जास्त पगार द्यावा लागला तरी आपण हे लक्षांत ठेवले पाहिजे की, ज्या मानानें जिनसांच्या किंमती वाढून व्यापाऱ्यांना व धंदेवाल्यांना फायदा होतो तितक्या मानाने मजुरांची मजूरी वढून त्यांना फायदा होत नाहीं. मजुरांप्रमाणे व ज्यांचे पगार ठराविक असतात अशा मध्यम वर्गतील लोकांचे फार नुकसान होते असा आपला हिंदु- स्थानच्या लोकांचा अनुभव आहे; व येथें जरी नोटा फाजील प्रमाणांत काढ- •ण्यांत येत नसल्या तरी रुपयासारखी कृत्रिम नाणी पाडण्याचा अधिकार सर्वस्वीं लोकमताची बिलकूल छाप नवलेल्या सरकारचे हाती असल्यामुळे व असे रुपये पाडणे हैं सरकारास फायद्याची बाब असल्यामुळे ( कारण एका रुपया- मागे सरकारास ६ आणे तरी नका होत असतो व तो फायदा विलायतेमध्ये गंग जळीरूपाने ठेवण्यांत येतो. ) हे रुपये लोकांच्या गरजांपेक्षा जास्त प्रमाणांत पाडले गेले आहेत व येथें ही भयंकर महागाई झाली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गांचे उखळ पांढरें झालें अहे व मजूरवर्ग व मध्यनस्थितीलोक ह्यांचे हाल होत आहेत.

 ह्याशिवाय त्या कागदी नोटांच्या किंमती उतरल्यानें अनेक तोटे होतात. नोटा जर १ रुपयासारख्या लहान किमतीच्या असल्या तर समाजां-