पान:भारतीय चलनपद्धती.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४
भारतीय चलनपद्धति.


वापरण्यांत येत असत. असो. अगदों अर्वाचीन कळों सुचारलेल्या युरोपखंडांत ह्या कागदी नोटांचा फायदा सरकार व लोक ह्यांना सरजूं लागला; व दह्रीं ह्या नोटा प्रचलित करण्याच्या बाबतीत विलक्षण क्रान्ती पाश्चिमात्य देशांत घडून आलेली आहे.

 (१८) कागदी नोटांचे प्रकार:--हे तीन प्रकार आहेत. एखाया पेढीजवळ किंवा सरकाराजवळ आपण कांही रुपये ठेवतों व हे रुपये अनमत ठेवल्याबद्दल आपणांस त्या पेढीकडून पावती मिळते. ही पावती हा एक नोटांचा प्रकार होय. एखादा इसम, एखादी सार्वजनिक किंवा अर्धवट सार्वजनिक संस्थ किंवा सरकार नोटा काढीत असते; व ह्या नोटा त्या इसमाकडे किंवा संस्थेकडे किंवा सरकारकडे परत आणून दिल्यावर ताबडतोब त्या नोटावर दिलेली रकम नाण्याच्या रुपानें लोकांस मिते. ह्या नोटा हा दुसरा प्रकार होय. नाण्याच्या रूपाने हा शब्द महत्वाचा आहे. कारण जर ह्या नाण्याचे- ऐवज जमीन किंवा दुसरा माल तो इसम किंवा ती संस्था किंवा तें सरकार देऊं लागेल तर ह्या ने टा ह्या दुसऱ्या प्रकारामध्ये येऊं शकत नाहीत. आणी. बाणीचे वेळी सामान्य माणसे किंवा व्यापारी लोक ह्यांना रोख नाण्यांचा जिंतका उपयोग होतो तितका उपयोग जमिनीपासून त्यांना होत नाही. ज्या वेळी सर- कार १०० रुपये किंमतीच्या, ५०० रुपये किंमतीच्या अशा नोटा काढीत असतें व ह्या नोटा खजिन्यांत आणून दिल्या असतांना त्याबद्दल रोख रुपये देण्यास बांधून घेत नाहीं, त्यावेळी नोटांचा तिसरा प्रकार दिसून येतो. अशा नोटा सरकारालाच वाढतां येतात असे नव्हे. तर पेढ्यांनाही त्या प्रचालत करतां येतात व त्यांचे दिवाळे निघाले म्हणजे त्यांनी काढलेल्या नोटांबद्दल रोख रुपये मिळगें अशक्य होऊन बसतें. आतां असा प्रश्न उद्भूतो की, ज्या नोटांबद्दल नाणी देण्यास सरकार बांधलेले नाही त्या नोटा लोक काय म्हणून स्वीकारतात ? ह्याचे उत्तर असे आहे की, सरकार जर सोटेशाही असले व तें लोकमतास भाब्यावर बसविण्याइतके लष्करी सामर्थ्यामुळे प्रबळ असलं तर लोकांना इच्छे- विरुद्ध ह्या नोटांचा स्वीकार करावा लागतो. दुसरे असे कीं, नाणें हें वस्तूंच्या