पान:भारतीय चलनपद्धती.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०
भारतीय चलनपद्धती


बेथराणीच्या कारक दीत शेधून काढला असे मॅकलिआडवें म्हणणे आहे. पण वस्तुस्थिति अशी आहे कीं, ग्रेश/मला हा मान विनाकारण दिला जात आहे. ह्याचे कारण असें कों, मेशामच्या पूर्वी कितीतरी वर्षे हा नियम ग्रीक लोकांना अरिस्टोफेन्सच्या वेळेपासून ठाऊक होता. असो. ग्रेशामचें म्हणणे असें कीं, होणकस नाणे चांगल्या नाण्याला प्रचारांतून हांकून देते. एकाच नांवाची नागी जर वजनति व कसांत सारखी नसली तर त्यांपैकी जी नाण सरस असतील ती जवळ ठेवून लोक हीणवस नाण्यांवरच काम भागवतील व सरस नाग एकतर आटवेली जातील व त्यांतून जी धातु निघेल तिवा उपयोग दागिनें, भांडीं वगैरे जिनसा करण्याकडे होईल; अथवा हो नाणी परदेशच्या व्यांना देण्याकरतां देशवाहेर पठवली जातील. ह्याचा एकंदर परिणाम असा होईल की, चांगली नाणी अदृश्य होऊन हीणकस नाण्यांचाच जास्त प्रसार होऊं लगेल. ज्या वेळों चांगली व होणकस नाणी एकाच घ तूर्वी असतात त्या वेळी हा नियम लागू पडतो असेच केवळ नाहीं, तर एकाच वेळी जर सोनें व चांदी किंवा सोनेवागदी नोटा प्रचारांत असतील व ह्यांपैकी एका धतूची किंमत उतलं असेल तर ती धातु दुसन्या धातूच्या नाण्यांना हुसकाऊन देईल व ती नाणीं अदृश्य होतील. हा नियम न्यूटनव्या गुरुत्वाकर्षणाच्या निय- माप्रमाणे लिकालाबाधित नहीं पहिली गोष्ट अशी कीं, द्दा नियम कांहीं विवि- क्षित प्रसंगी दृग्गोचर होत असतो, त्याचप्रमाणे त्या नियमाला नियम है नांव कितपत शोभेल हा प्रश्नच आहे. कारण अशा तऱ्हेनें चांगल्या नाण्याला वाईट नाण्यानें हुसकाऊन देणे ही फार तर प्रवृत्ति ह्मणता येईल. कारण प्रत्येक वेळीं हटकून चांगली नाणी अदृश्य होतात असे लगतां येत नाहीं. उदाहरणार्थं, ज्या वेळी देशांत पदार्थाच्या किंमती वाढत असतात; व असतील तेवढ्या नाण्यांची- मग तो नागी होणकस असोत असोत लोकांना जरूर असते, त्या वेळी है ना चांगले अहे किंवा होणकस आह है लोक पहात बसत नाहीत. त्यांच्या छानांत आलेले नाणे इतर लोक स्वीकारतात वा नाहीं हें ते पहात असतात. विशेषतः दुकानदार लोक व सवकार ह्यांना प्रत्येक नाणे जोखून घेण्याला सवडव नसते. ज्या वेळीं पैशाना व्यापार करणाऱ्या लोकांना एकाच नांवाच्य