पान:भारतीय चलनपद्धती.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
नाण्याविषयी सामान्य विचार.

१९


लाचा प्रचार कमी होऊन त्याचा उपयोग चांदी खरेदी करण्याकडे होऊं लागेल. पण ह्याच वेळी चांदीला जस्त मागणी आल्यामुळे तिचा भाव सोन्याच्या मानाने च लागेल व सोन्याचा पुरवठा चांदी खरेदी करतो म्हणून एकदम व ढल्या- मुळे चांदीच्या मानाने त्या सोन्याची किंमत उतरूं लागेल. अशा रीतीनें परस्पांना सांवरून धरण्याची शक्ती ह्या दोन धातूंत असल्यामुळे सरकारने ठर वेलेला दर व बाजारांतील दर ह्यांमध्ये फारसा फरक पडणार नाहीं. मात्र एक गोष्ट आपण गृहीत धरली पाहिजे. ती ही की, ही द्विचलनपद्धति पुष्कळ दशांत असून ह्या दोन्ही धातु पुष्कळ प्रमाणांत प्रचारांत असल्या पाहिजेत. ह्य- चरून एक गोष्ट वाचकांप कळलीच असेल कों, द्विचलनपद्धति एकाच देशांत चालणे शक्य नाहीं. असो. ह्या विषयाचा पुनः एकदा आपणास विचार करावा लागणार असल्यामुळे हा विषय यथेच आउपतां घेतो.

 चवथा प्रकार म्हटला ह्मणजे संमिश्र चलनपद्धतीचा होय. ह्या प्रकाराचा विशेष असा आहे की, ह्यामध्ये एकच धातु वर्णे पाडण्याचे काम उपयोगांत आणली जाऊन त्या धातूचें नाणे अमर्याद प्रमणांत वायदेशीर चलन म्हणून मानण्यांत येतें, व सोयीकरतां म्हणून इतर धातूंची नाणी पाडण्यांत येऊन देवघेवीच्या वेळी मर्यादेत प्रमाणांत त्यांचा स्वीकार करण्यांत येतो. हल्लों इंग्लंडांत जी पद्धति आहे ती ह्या प्रकाराचे निदर्शक आहे. हिंदुस्थानांतही रुपया हें मुख्य नाणे मानलेले असून तांबे, निकल ह्या धतूंच्या नाण्यांचा मर्यादित प्रमाणात लोक स्वीकार करत असतात.

 (१५) ग्रेरॉमनें शोधून काढलेला नियमः- आतांपर्यंत आपण धातूंच्या नाण्याच्या चलनपद्धतीचा विचार केला. आत कागदी नोटरांच्या चलनपद्धतीचा विचार करावयाचा; पण हा विचार करण्यापूर्वी एका मुद्याचा विचार करणे अवश्य अहे. वर एक दोन ठिकाणी ग्रेशमच्या नियमाचा उल्लेख आलेला आहे. हा नियनकाय अहे व तो कितपत सत्याला धरून आहे ह्याचा विचार करून मग कागदी नोटांच्या चलनपद्धतीकडे वळू. ह्या नियमाला ग्रेशामचा नियम अशी संज्ञा आहे; कारण हा नियम प्रथम ग्रेशामनें इलेझा-