पान:भारतीय चलनपद्धती.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८
भारतीय चलनपद्धति.

तितक्या रकमेपर्धेत दोन्हापैकी कोठल्याही ना यानें पैसे चुकते करण्याची मुभा असावी व सरकार- सारा द्यावयाचे प्रसंगी त्याला वाटेल त्या धातूच्या ( सोने किंवा चांदी त्यापैकी ) नाण्यानें देण्याची परवानगी अस.वी. अशी परानगी सरकार जेव्हां देत असते तेव्हां सोने व चांदी ह्यांच्या नाण्यांत प्रमाण काय असवें हे त्याने ठरविले पाहिजे व हे प्रमाण सोन्याचांदीच्या बाजारांत ह्या दोन ध तूंच्या किमतीत असलेल्या प्रमाणाबरहुकुम पाहिजे. ह्या दोन प्रमाणांत जर फरक पडूं लागला तर अर्थात् प्रेरॉमने शोधून काढलेला नियम अमलांत येऊन ज्या धातूची किंमत उतरली असेल त्या ध तूच्या नाण्यानेंच लोक सरकारांस पैसे देऊं लागतील व ज्या धातूची किंमत वाढलो असेल किंवा पूर्वीप्रमाणेच बायम असेल त्या धातूंची राणी लोक सांठवू लागतील, किंवा परदेशच्या व्यागन्यांना ही नाणी देऊन शकतील.

 कांही लोकांचे म्हणणे असे आहे की, सरकारनें सोने व चांदी ह्या दोन धातूंच्या नाण्यांम ये ठरविलेले प्रमाण व ह्या दोन घ तूनघील बाजारांत अस लेल्या किंमतीचें प्रमाण ह्यांत फरक पडण्याचा फार संभव आहे कारण ह्या दन धातु कांहीं नेहमाच सारख्या प्रमाणांत उत्पन्न नाहींत वं ह्यांची लोकांकडून होणारी कागणाही व्यापारी परिस्थिति वारंवार बदलत असल्यामुळे सारखी हात नाही तेव्हां सरकारने ठरविलेले प्रमाण कायम कसें रहावें ? उलटपक्षी दुसऱ्या लोकांचे असे म्हणणे आहे की, ह्य वर सांगिलेल्या दोन प्रमाणंत जर थोडाबहुत फरक पहूं लागला तर अशा वेळी ज्या देशांत द्विचलन- रद्धति आहे त्या देशांत सोने व चांदी भरपूर असल्यास हा फरक लवकरच नाहीसा होईल; कारण सोने व चांदी ही दोन्ही मुख्य चलन मानल्यामुळे ह्या दोन धातूंत एकमेकांना सावरून धरण्याची शक्ती येते. उदाहरणार्थ, ज्या ठिकणीं ही द्वेचलनपद्धति प्रचारात नाही अशा ठिकणीं चांदी जास्त झाल्या- मुळे हा पद्धति प्रचारांत असलेल्या देशांत चांदीचा भाव जर उतरूं लागला व अशा रीतीनें सरकारने ठरविलेला चांदीचा दर व बाजारांतला चांदीचा दर ह्यांमध्ये फरक पडूं लागला तर प्रेशॅमच्या नियमाप्रमाणे सोन्याचा दर वाढून