पान:भारतीय चलनपद्धती.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६
भारतीय चलनपद्धति.

प्रचारांत होतें. हल्लींसुद्धां कांहीं देशांत अतिशय किंमत उतरलेल्या नोटा ह्याच प्रचलित असल्या म्हणजे त्या देशांत ह्या कागदी नोटा व्यतिरिक्त इतर कोठल्याही धातूचें नाणें प्रचारांत राहू शकत नाहीं. पण एक गोष्ट मात्र आपण विसरता कामा नये. ती ही कीं, हल्लीं प्रत्येक देशांत एकाच प्रकारच्या नाण्याने लोकांचें काम भागणार नाहीं. ज्या लोकांना मोठ्या किंमतीच्या रकमा व्यापारांत किंवा इतरत्र यावयाच्या असतात त्या लोकांच्या सोयीकरता साव्हरिन किंवा १०, २५, ५० रुपये किंमतीच्या नोटा सरकारनें प्रचारांत आणल्या पाहिजेत. अशा लोकांना एक रुखाय किंवा पावल्या, अधेल्या सारखी नाणी सोयीचों होणार नाहीत; पण ज्या लोकांचे उत्पन्न बेताबाताचेच असतें त्या लोकांच्या सोयीकरता चांदीची नाणींच सुरू करणे इष्ट असतें. त्याचप्रमाणे कोठल्याही सरकारने निव्वळ कागदी नोटा काढून त्याचा प्रचार आपल्या देशांत करूं नये. तेव्हां एकंदर तात्पर्य है आहे कीं, प्रत्येक देशांत एक सोन्याचें नाणे मुख्य नाणे म्हणून प्रचलित असावें; व वस्तूंची किंमत ह्या सोन्याचे नाण्याने ठरविण्यांत यावी. हे सोन्याचे नाणें लोकांच्या सांपत्तिक स्थितीला अनुरूप असे असावें. हिंदुस्थासारख्या देशांत. इंग्लिश साव्हरिनसारखे मोठ्या किमतीचे नाणे सुरूं न करतां १० रुपये किंमतीचे सोन्याचें नाणें सुरू होणे श्रेयस्कर आहे. ह्या सोन्याच्या नाण्यांना पोषक अशी इतर धातूंची नाणी पाडण्यांत यावीत व त्यांचा संबंध सोन्याच्या नाण्याशी असून तीं मुख्य नाण्याचे विभाग असावीत.

(१४) धातूच्या नाण्याच्या चलन पद्धतीचेप्रकार:-
पहिल्यानें कोणत्या चलनपद्धतीस प्रारंभ झाला असावा ह्याचा जर आपण विचार केला तर आपणांस असे दिसून येईल कीं, सोनें, चांदी ह्यांसारख्या मूल्य- वान धातु इतर व्यापारी मालाप्रमाणेच वजन केल्या गेल्यावर चलन म्हणून बापरल्या जात. सरकार जरी हल्लीं ठराविक आकाराची, वजनाचीं व कसाच नाणीं पाडीत असतें तरी लोक सरकारावर सर्वस्वीं मिस्त न ठेवतां स्वतः ना.. ण्यांचा कस व वजन हीं जोखून बवत असतात. नाण्यांचें वजन करून मग तो प्रचारांत आणण्याची पद्धत अजूनही परराष्ट्रीय व्यापाऱ्यांना पैसे देण्याचे वेळीं दिसून येते.