पान:भारतीय चलनपद्धती.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
नाण्याविषयीं सामान्य विचार.

१५

पित झाल्यामुळे एखाद्या माणसानें कर्जफेड होत असतांना जर ह्रीं स्वीकार- ण्याचें नाकारलें तर ते सरकार कायद्याच्या जोरावर त्या माणसास ती नाण स्वीकारण्यास भाग पार्डल. ह्या दोन कारणांशिवाय लोकांचा त्या नाण्यांच्या स्वीकाराबद्दल जो भरंवसा असतो त्याची आणखीही कारणे आहेत. बँक नोटा, हुंड्या, रेल्वे डिवेंचर ह्यांसारखे चलनी नाण्याचे प्रकार, ज्या संस्था लोकांत प्रच- लित करतात त्या संस्थांवर लोकांचा विश्वास असतो म्हणूनच त्यांचा प्रचार होत असतो.

 (१३) विनियम चलनाचे प्रकारः- त्याचे स्थूल मानानें दोन वर्ग करता येतील. एका वर्गात सर्वत्र प्रसार असलेले चलन घालता येतील. ह्यांमध्ये धातूची नाणी, ज्या नोटांना नाणी मिळत नाहींत अशा नोटा व ज्या- बद्दल नाणी मिळता अशाही नोटा वगैरे समाविष्ट होतात. दुसऱ्या वर्गात मर्यादित प्रसार असलेले चलन असतात. उहाहरणार्थ, पेढ्यांवर दिलेल्या हुंड्या किंवा चेक (ह्या हुंड्या बँकेत ठेवलेल्या अनामत रकमेबद्दल पावत्या असतात ) एका व्यापायानें माल पाठावल्यावर दुसन्या व्यापायावर काढिलेल्या हुंड्या, व जिन्नस गहाण ठेवल्याबद्दल दिलेले तारण रोखे व म्युनिसिपॉलिट्या, रेलवे कंपन्या सारख्यांनी काढलेले कर्ज रोख हे सर्व मर्यादित असलेल्या चलनाचे प्रकार होत. त्यांचा प्रचार मर्यादित असण्याचे कारण असे आहे की, त्या सरकाराने सुरू केलेल्या नसतात.

 वर सांगितलेल्या विनियमचलनाच्या प्रकारांवरून वाचकांच्या लक्षांत ही गोष्ट आलीच असेल कीं, चलनी नाण्यांचा प्रश्न वाटतो तितका साधा नाहीं. आपण असे पाहतों कों, बहुतेक देशांत नाणी निरनिराळ्या धातूंचीं व नांवांची असून ही नाणीं, चलनी नोटा व निव्वळ खाजगी लोकांच्या किंवा अर्धवट किंवा पूर्ण सार्वजनिक स्वरूपाच्या संस्थांच्या पतीवर क ढल्या गेलेल्या हुंच्या, रेलवे डिवेंचर वगैरे ह्रीं सर्व एकसमयावच्छेदेकरून समाजांत प्रचलित असतात. कधी कधी आपण असें ऐकतों कों, समाजांत एकच वस्तुचे चलन असतें. फार प्राचीन काळी प्रोस संस्थानांमध्यें ताच्याचें किंवा लोखंडाचें असे एकच नाणें