पान:भारतीय चलनपद्धती.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४
भारतीय चलनपद्धति.

विण्याचे एक ठराविक प्रमाण आपणांस मिळते. इंग्लंडमध्ये असलेला साव्हरिन, अमेरिकेतील डॉलर ह्रीं ह्या प्रमाणाची उदाहरणें होत, व ह्या देशांत सर्व वस्तूंच्या किंमती ह्या ठराविक प्रम. णांत निश्चित केल्या जातात. प्रत्येक वेळी किंमत देत असतांना ह्या ठराविक प्रमाणाचाच उपयोग करण्याची जरूरी नाहीं. एखाद्या वस्तूंची किंमत १० साव्हरिन आहे असे ठरल्यावर त्या साव्हरिनऐवजी तित- क्याच किमतीचीं इतर धातूंची नाणी किंवा कागदीं नोटा दिल्या तरी चालतात.

 त्याशिवाय इतर उपयोग म्हटले म्हणजे हे प्रमाण एकदां निश्चित झाल्या- चर वस्तुंची किंमत ताबडतोब न देतां कालांतराने देण्याचे साधन म्हणून पैसा उपयोगी पडतो व पुष्कळ काळपर्यंत पैशाचा संग्रह करतां येतो. कापड, धान्य वगैरे वस्तु कालांतरानें कुजतात, सडतात व नाश पावतात; पण सोनें, चांदी, तांबे ह्या धातू अशा आहेत की, त्यांचे वर्णन नैवं पावकः । न चैनं क्लेदन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ ह्या भगवद्गीतेच्या शब्दांत करतां येईल. ह्यांशिवाय पैशाचे इतरही उपयोग आहेत; पण ते विशेष महत्वाचे नसल्याने त्यांचा उलेख करण्याची जरूर नाहीं.

 असो. वर सांगितलेल्या मुख्य उपयोगांपैकी सर्वांत मुख्य उपयोग म्हणजे पैशानें वस्तूंची अदलाबदल सुलभ होते हा होय. विनियमसाधन म्हणून पैशाचा लोकांत जो प्रसार होतो त्याची अनेक कारणे आहेत. पण मुख्य कारण हे आहे कों, ह्या पैशाळे विनियमचलन (Circulating Medium of Ex- change ) या नात्यानें नाणे, नोटा वगैरे जे अनेक प्रकार आहेत ते बोक मान्य करतील असा सर्वांचा भरवा असतो. लोकांना ही जी खात्री चाटते त्याची हीं अनेक कारणे आहेत. लोकांना असे वाटते की, समाजांत सोन्याचांदीला त्यांच्या नैसर्गिक मूल्यामुळे केव्हाही मागणी असणार व लोक त्यांचा स्वीकार करणार. एवढेच नव्हे तर त्या धातु जवळ बाळगण्याची दांव सर्वांनाच असणार. तेव्हां अशा धातूंची नाणी जर समाजांत प्रचलित असली तर त्यांचा स्वीकार सर्वत्र हेईल असा लोकांचा भरवसा असतो. दुसरे असें कीं, अशा प्रकारची नाणी जे सरकार सुरू करतें तें सरकार भरभकम पायावर प्रस्था-