पान:भारतीय चलनपद्धती.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
नाण्याविषयीं सामान्य विचार.

१३


रौतीनें होऊं लागते व तशी ती सुरू झाली म्हणजे श्रमविभागाचें तत्व जारीनें बंमलांत येऊ लागतें व हे तत्व प्रचारांत येऊं लागले म्हणजे उद्योगधंद्याची वाढ होऊन प्रत्येक माणसाला भापल्या योग्यतेप्रमाणे व इच्छेप्रमाणे धंद्याची निवड करून स्वतःची उन्नति करून घेतां येते.

 (१२) पैशाचे उपयोगः- पैशाचे अनेक उपयोग आहेत. त्यांपैकी मुख्य उपयोग म्हणजे पैशामुळे वस्तूंची अदलाबदल सुलभ रीतीनें करतां येते हा होय. काही लोकांची अशी कल्पना आहे कीं, पैशाची प्रत्यक्ष मदत वस्तुविनि- यमाचे काम फारच थोडी होते, कारण हल्लींच्या विसाव्या शतकांतल्या व्यापारी युगांत सुद्धां जिनसांची अदलाबदल जिनसांनींच होत असते, व एखाया देशाचा जर आपण व्यापार घेतला तर त्या देशचे व्यापारी परदेशी व्यापाऱ्यांना रोख पैसे न देतां ने आपापसांत मालांची नुसती अदलाबदल करीत असतात. ही कल्पना सर्वोशांनी खरी नाही. हल्लीच्या औद्योगिक काळांत पैशाचा उपयोग न करण्याचें मनांत आणले तर हल्ली प्रचलित असलेला श्रमविभाग अशक्य होऊन बसेल. मालाची अदलाबदल करणे ही साधी गोष्ट नव्हे. ज्यावेळी एखादा व्यापारी आपला माल विकतो त्यावेळी तो गि-हाईकाकडून रोख पैसे घेऊन आपल्याला हवा तो माल दुसऱ्या व्यापा-याकडून घेत असतो. अशा दृष्टीवें विचार केला असतां व्यापारी देवघेवींत पैशाच्या उपयोगाकडे दुर्लक्ष्य करणे चुकीचे होईल. नुसत्या वस्तूंच्या साटेलोट्यानेंच जगांतील व्यापार चालतो हे म्हणणें खोटें आहे.

 पण पैसा म्हणजे रोख नाणे किंवा नाणेवाचक एकादी हुंडी किंवा बँक नोट असा अर्थ आमच्या म्हणण्याचा नाहीं. आमचें एवढेच म्हणणे आहे कीं, मालाची खरेदी व विक्री होत असतांना त्यांची किंमत पैशांत व्यक्त झालीच पाहिजे व मालाची अदलाबदल होत असतांना जर एकाद्या व्यापाऱ्याने दुसन्या व्यापाऱ्याकडून कमी किंमतीचा माल विकून जास्त किंमतीचा माल विकत घेतला तर त्याला वजाबाकी करून जादा किंमतीबद्दल रोकड द्यावी लागेल.

 ह्या उपयोगाशी पूर्ण तादात्म्य असलेला असा दुसरा उपयोग म्हटला म्हणजे पैशामुळे वस्तूंच्या किंमती निश्चित करतां येतात व किंमती ठर-