पान:भारतीय चलनपद्धती.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२
भारतीय चलनपद्धति.

नाणीं देशांत परत येतात. शिवाय असे कांही प्रसंग व्यापारांत येतात कीं, त्या- वेळी सोन्याचांदीच्य| लगडी उपलब्ध नसल्यामुळे नाणी पाठवावींच लागतात. अशा वेळी व्यापारी लोक स्वतः नुकसान न सोखतां देशांत आणलेल्या माला- वर थोडी किंमत चढवूनं गिन्हाइकांकडून ते नुकसान भरून काढतील हें उ- घड आहे.

 अशा तऱ्हेची दोन पक्षांची त्या विषयासंबंधानें विचारसरणी आहे. एकं- दरींत विचार करतां असे दिसतें कीं, नाणी पाडण्यास जो प्रत्यक्ष खर्च लागतो तेवढाच सरकारने लोकांकडून त्यांची नाणी पाडण्याबद्दल घ्यावा. त्याहून जास्त पैसे घेणे म्हणजे धातूंच्या लगडी घेऊन येणाऱ्या माणसाचे नाहक नुकसान करणे आहे; इतकेच नव्हे तर लोकांची विनाकारण फसवणूक होऊन होणकस नाण्यापासून होणारे तोटे दिसूं लागतात.

 (११) विनिमयचलनः - ( Medium of Exchange) पूर्वी ज्यावेळीं वस्तूंनीं वस्तूंची खरेदी विक्री करण्याची पद्धती होती. त्यावेळी व्यापा- राची एवढी वाढ झालेली नव्हती; पण व्यापारांत ज्यावेळी पैशांचा उपयोग कर व्यांत येऊं लागला तेव्हां समाजांत मोठीच क्रांती घडून आली. पूर्वी जमीनदार व त्यांची कुळे, किंवा राजे व त्यांचे ठेवलेले नोकर-मग ते नोकर लष्करी खा- त्यांत काम करीत असोत किंवा इतर खात्यांत काम करीत असोत ह्यांचे संबंध पूर्वापर रूढीनेंच ठरलेले असत व हे संबंध जवळ जवळ गुलामगिरीचेच असत; पण ज्यावेळी कामावर ठेवलेल्या माणसास पैशाच्या रूपानें वेतन देण्याचा प्रघात सुरू झाला तेव्हां सेव्य व सेवक त्यांच्या परस्परसंबंधांत विलक्षण स्थित्यंतर घडून आलें व त्या संबंधांना ठरावाचे रूप प्राप्त झालें. अशा प्रकारचें स्वरूप प्राप्त झाल्यावर समाजाची कशी प्रगति झाली हे सांगण्याचें हे स्थळ नव्हे; पण एवढेंच येथें सांगितले असतां पुरे होईल की, सामाजिक व राजकीय स्वातंत्र्य त्या बदल- लेल्या परिस्थितीमुळे लोकांस मिळून एकंदर मानवजातीचा पुष्कळ फायदा झाला. असा फायदा होण्याची अनेक कारणे आहेत. वस्तूंची अदलाबदल कर ण्याकरितां पैशाचा उपयोग होऊं लागला म्हणजे ही अदलाबदल फार सुलभ