पान:भारतीय चलनपद्धती.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
नाण्याविषयी सामान्य विचार.


 (२) दुसरी गोष्ट म्हणजे नाण्याचा आकार व वजन हीं सोयीचीं पाहिजेत. नाण्याचा मुख्य हेतू असा आहे की, ते लोकांच्या हातांत नेहमी खेळले पाहिजे. हा हेतु जर साध्य व्हावयाचा असेल तर त्याचा आकार व वजन ही बेताची व सोयीची पाहिजेत.

 (३) चांगले नाणे असे असले पाहिजे की, इतर लोकांना बनावट रीतीनें तें पाडतां येऊं नये. ही गोष्ट जर साध्य व्हावयाची असेल तर नाण्याबर जी आकृति उठवावयाची, तिचे अनुकरण इतरांस करतां येऊं नये व तसें अनु- करण जो करूं लागेल त्याला ते त्रासाचें व खर्चाचे वाटले पाहिजे. हल्लीं नाणीं पाडण्यास लागणाऱ्या यंत्रामध्ये इतकी सुधारणा झाली आहे की, बनावट नाणी पाडणें बहुतेक अशक्यच होऊन बसले आहे.

(४) शेवटली गोष्ट म्हणजे नाणी टिकावू असून तीं चटकन ओळखता आली पाहिजेत. प्रत्येक नार्णे इतके टणक व चिवट असावें कीं, ते नेहम वापरण्यांत आल्यामुळे ते झिजूं नये, त्याचप्रमाणे ते इतके ठोकून वाढवितां यावें कीं, त्यावर छाप सहज उठवितां यावा. नाणे टिकाबूं करण्यास सोपी युक्ती अशी आहे की, त्या नाण्याच्या भोवतालचा काठ त्याच्या पृष्ठ भागापेक्षा किंचित उंच असावा म्हणजे नाणे फारसें झिजत नाहीं.

 ५. नाणें कोणी पाडावें:-३ल्हीं नार्णे पाडण्याचा अधिकार असणें हैं राजसत्तेचे चिन्ह मानले गेले आहे; अतएव प्रत्येक राष्ट्रांत तेथील सरकारच हा अधिकार आपल्या हातांत ठेवीत असते. पण असा एक काळ होता की, त्या काळांत खाजगी व्यक्तींकडे हा अधिकार सोपविलेला असे. आपणांस ठाऊक आहे की, पेशवाईत नाणे पाढण्याचा अधिकार कांही ठराविक लोकांकडे असे; पण अशा पद्धतीचा दुष्परिणाम काय होतो हे श्रीमंत नानासाहेब पेशवे त्यांस कळून चुकल्यावर त्यांनी टांकसाळीची व्यवस्था आपल्या हातांत घेतली. युरोपखंडातही हा अनुभव आल्यामुळे सरकार आपल्या हातांत हा नाणे पाडण्याचा अधिकार ठेवीत असते. पूर्वी इंग्लंडांत पेढ्यांना आपल्या नोटांचा प्रसार करण्याची मुभा