पान:भारतीय चलनपद्धती.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारतीय चलन पद्धति.

देशांत सोन्याचाच उपयोग नाणी पाढण्याचे काम होत असतो व थोड्या किंमतींची नाणों पाढण्याकडे चांदीचा उपयोग करण्यांत येतो. ज्या देशांत सोन्याचें नाणें असून सर्व वस्तूंची किंमत सोन्यानें ठरविली जाते त्या देशाला आपली आर्थिक उन्नति करून घेतां येते असा युरोप खंडांतल्या राष्ट्रांचा अनुभव आहे. तेव्हां हिंदुस्थानचे लोक ह्य देशांत सोन्याची नाणी सर्रास सुरू करा असे कां ह्मणतात तें आतां वाचकांस समजेल.

 (८) चांगल्या नाण्याला लागणारे आवश्यक गुणः- कोठलेही नाणें जर लोकप्रिय व्हावयाचें असेल व त्याला ' चांगले नाणे' अशी जर संज्ञा द्यावयाची असेल तर खाली सांगितलेले गुण त्या नाण्यांत असले पाहिजेत:-

 (१) नाण्याच्या वजनांत व घटनेंत पूर्ण सारखेपणा असणे. ही गोष्ट फार जरूरीची आहे. नाणें तयार करितांना तें पुष्कळ दिवस टिकावें म्हणून सोन्याच्या किंवा चांदीच्या धातूंत थोडें तांबें मिसळण्याची चाल आहे; पण ही तांब्याची धातु प्रत्येक सोन्यारूप्याच्या नाण्यांत ठराविक प्रमाणांतच मिसळली पाहिजे व सर्व नाणीं सारख्या किंमतीची बनविली पाहिजेत. ज्यावेळी नाणे पाडण्याच्या कलेत पूर्ण वाढ झालेली नव्हती अशा वेळी नाणीं सारख्याच किंमतीचीं पाडलीं जात नसत.

 तसेच नाण्याचें वजनही कमीजास्त असतां कामा नये. व्यवहारांत ही गोष्ट सर्वोशांनी अमलांत आणणे शक्य नाही. तरीपण शक्य तितकी काळजी ह्या बाबतींत घेतली पाहिजे. ज्या देशांत नाणें पाडले असेल त्या देशांत त्याचा व्यवहार नुसता मोजून होतो. कारण त्या नाण्याची कायद्यानें ठरविलेली किंमत लोकांस मान्य असते. मी जर एकाद्या दुकानांत गेलों व १० रुपयांचे कापड खरेदी केलें तर दुकानदार नुसते रुपये मोजून घेईल व त्या रुपयांवर जर सर- कारी शिक्का असला तर ती नाणी तोलून पाहण्याच्या भानगडींत तो पडणार नाहीं; पण परदेशी व्यापायाला जर मला रुपये द्यावयाचे असतील तर तो त्या रुपयांचें वजन करून जिंतकी चांदी त्या रूपयांत असेल त्या चांदीच्या किंम तांचा माल देईल. त्या कारणास्तव नाण्याचें वजन बिनचूक असणे अवश्य आहे.