पान:भारतीय चलनपद्धती.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
नाण्याविषयीं सामान्य विचार.


आहे को सुधारलेल्या देशांत आयात मालाची किंमत निर्गत मालाच्या किंमतीनें परस्पर फिट्न जाते व इंग्लंडसारख्या देशांत तर बहुतेक व्यवहार पतीवर व कागदी नोटांवरच चालतो. ह्या सर्व गोष्टी सामान्यपणे खन्या आहेत; पण त्यां मोन्याच्या आधारावरच चालतात हे आपण विसरता कामा नये. इंग्लंडमध्ये लोकांची पूर्ण खात्री असते कीं, आपण आपल्या नोट। 'बँक ऑफू इंग्लंड मध्ये घेऊन गेलो तर आपणांस नोटांचेऐवज सोने खास मिळेल व ह्याच विश्वासावर लोक आपलें काम नोटावर भागवितात. लोकांचा हा विश्वास कांहीं कारणांमुळे जर उडाला, तर ते नोटा फेंकून देऊन सोनें जवळ ठेऊन आपला व्यवहार सोन्यानेंच करतील ह्यांत शंका नाहीं.

 (७) सोन्याचांदीचें महत्त्वः - आतां प्रश्न असा उद्भवतो की, फार प्राचीन काळापासून सोने व चांदी त्यांनांच महत्व कां आलें आहे ? सोन्या- चांदीला एवढे महत्व येण्याची अनेक कारणे आहेत. पहेले कारण असे दिसतें की, लोकांना ह्या दोन धातूंच्या योगाने आपले शरीर सुशेमित करण्याची हौस पुरवून घेतां येत असे. आपल' असा अनुभव आहे की, ज्या वस्तूंच्या योगोनें मनुष्यास डामडौल करता येतो त्या वस्तूंना नेहमी मागणी असते; व अशा वस्तु जर विनियमांची साधनें होऊन बसली तर त्यांत आश्चर्य मानण्याचें कांहीं एक कारण नाही. दुसरे कारण असे आहे कीं, ह्या धातु गंज वगैरे चढून कधींही कमी होत नाहीत. तिसरें कारण असे आहे की, ह्या धातु लोकांच्या गरजांना पुरून उरणाऱ्या असून पुनः त्या साधारणपणे दुर्मिळ आहेत; कारण त्या थोड्या प्रमाणांत व बऱ्याच खर्चानें प्राप्त होणाऱ्या आहेत. चायें कारण असे दिसते की, ह्या धातूंना पुष्कळ वर्षीच्या रूढीने महत्त्व आलेले आहे. सर्वांनाच ह्या दोन धातु हव्या आहेत व त्यांचा प्रसार फार प्राचीन काळापासून चालू असल्यामुळे त्यांना साहजिकच महत्त्व आलेलें आहे, व ह्या महत्वामुळे त्यांची किमतही आजपर्यंत टिकलेली आहे व ज्या माणसाजवळ किंवा राष्ट्राजवळ या धातु जास्त प्रमाणांत असतात त्या माणसाचा वत्या राष्ट्रांचा दर्जा राजकीय दृष्टया श्रेष्ठ मानला आहे. त्यांतल्यात्यांत चांदीपेक्षां सेनें जास्त मौल्यवान् असल्यामुळे बहुतेक सुधारलेल्या

क.म. म. द. पा. पोतदार,
ग्रंथसं