पान:भारतीय चलनपद्धती.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारतीय चलनपद्धति.

नाहीं. पण ही आकृति प्रचारांत आल्यावर लोकांच्या मनांत धातूची वाटोळी तबकडी करून तिजवर भोके पाडणे हो कल्पना आली असावी; व एकदा अशा तऱ्हेची नाणी सुरू झाल्यावर त्यांवर खुणेकरता कांहीं आकृति काढावी म्हणजे लबाडी होणार नाहों ही कल्पना सहजच सुचली असेल. पूर्वी नाण्याच्या एकाच बाजूला छाप उठवला जाई; पण पुढे पुढे असा अनुभव येऊं लागला कीं, दुसऱ्या बाजूवर कांहीं आकृति नसल्यामुळे लुच्चे लोकांना त्या नाण्यांतील कांहीं धातू काढून बेतां येऊं लागली. ही लबाडी थांबावी ह्मणून नाण्याच्या दोन्ही बाजूंवर आकृती उठविण्याचा प्रचार सुरू झाला व नाण्याच्या कांठावर कंगोरेही पाडण्यात येऊ लागले. अशा रीतीने हल्ला प्रचारात असलेल्या नाण्याची वाढ झालेली आहे.

 (६) नाण्यांत असलेली धातुः - निनिराळ्या देशांत निरं- निराळ्या वेळी निरनिराळ्या धातूंची नाणी बनविण्यात आलेली आहेत. लोखंड, तांबे, शिसे, कथिल, प्लॅटिनम, रुपें व सोनें त्या सर्व धातूंचा उपयोग करण्यांत आलेला आहे. कोणत्या वेळी कोणत्या धातूची निवड होत असे हें त्या वेळी असलेल्या वस्तूंच्या किमतीवर च लोकांच्या उत्पन्नावर अवलंबून असे. पण आपण असा एक सामान्य नियम लक्षांत ठेविला पाहिजे की, लोकांची पैसे मिळविण्याची व खर्च करण्याची शक्ति व रहाणी जशी जास्त प्रमाणांत वाढते तशी जास्त किमतीच्या नाण्याची जरूरी लोकांस भासत असते.

 हल्ली जगात असलेली प्रचलित नाणी जर आपण पाहिली तर चांदी व सोनें त्या दोन धातूंचाच नाणे पाढण्याचे कामी उपयोग होत असतो. आतां हा गोष्ट खरी आहे की, ही सुधा'लेल्या देशांत कागदी नोटा, मग त्या सरकारनें काढलेल्या असोत किंवा पेढ्यांनी काढलेल्या असोत, व्यापारांत देवघेवीच्या काम उपयोगांत आणलेल्या असतात व त्यामुळे सोन्या रुप्याची पूर्वीइतकी जरूरी राहिली नाही. तरीपण वस्तुविनियमसाधन ह्या नात्यानें त्या सोन्या- कृप्याची गरज केव्हाही भासणारच. निव्वळ कागदी घोडे नाचवून व्यापाराची प्रचंड उलाढाल जर कोणी करूं ह्मणेल तर व्यापारी आणीबाणीचे वेळी हा कानदी डोलारा ढांसळून पडल्यावांचून राहणार नाहीं. कांहीं लोकांचे अर्से ह्मणणे
.