पान:भारतीय चलनपद्धती.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
नाण्याविषयी सामान्य विचार.


ज्ञान प्राप्त झाल्यावर त्या द्रव्याची निरनिराळी नाणीं पाडणे सोपे होऊं लागले. कारण आपण हल्ली नाणे पाडतो म्हणजे काय करतों ? एखाद्या धातूचा तुकडा घेऊन त्याचे सारख्या आकाराचे आपण लहान लहान तुकडे पाडतों व त्यावर एका ठराविक किंमतीचा छाप मारल्यावर हा तुकडा अमुक किंमतीचा आहे हे अभि- ज्ञान किंवा ही ओळख आपणांस होऊं लागते.

 (५) नाण्याची वाढः - नाण्याची व्याख्या जेव्हान्सनें अर्शी केलेली आहे:- 'नाणी हे एक प्रकारचे धातूचे गट होत व त्यांचे वजन व कस हीं त्या धातूच्या वरच्या भागावर काढलेल्या आकृतीच्या खरेपणावरून निश्चित केली जातात. नाण्यावर जी आकृति काढली असते ती जर झिजून गेली नाही तर त्या नाण्यांत मूळची शुद्ध धातु व ठरविलेलं बजन कायम आहे, त्यांत इतर धातूची भेसळ केलेली नाही व नाणे कानसून काढ- लेले नाही असें खास समजावें. नाण्याची उत्क्रांति कशी झाली हे समजणे फारसें अवघड नाहीं. प्रथम प्रथम ज्या वस्तु जात्याच एका स्वरूपाच्या असत त्यांना विवक्षित आकार, परिमाम व वजन देगें ही पहिली पायरी होय. उदाइ- रणार्थ, आफ्रिकेतल्या निप्रोच्या कवड्या, वगैरे जिनसा होत. ह्याच युक्तीचा अवलंब एकामागून एक प्रचारांत येणाऱ्या इतर वस्तूंच्या बाबतीत करण्यांत येऊं लागला. ज्यावेळीं वस्तूंची अदलाबदल करण्याचे कामी धातु उपयोगांत येऊं लागली त्यावेळी तिच्या लहान पाचरी किंवा खिळे किंवा निमुळते लहान आकाराचे स्तंभ बनावेण्यांत आले. हह्रींसुद्धां अंतर्राष्ट्रीय व्यापारी देवघेवीच्या वेळीं रोख नाणीं न देता लगडीच देण्यांत येतात व ह्या लगडी म्हणजे गत कालच्या निमुळत्या स्तंभाचे निदर्शकच होत असे म्हटले पाहिजे. व्यापारी लोक नाण्याचेऐवजी लगढी जास्त पसंत करतात, त्याचे कारण असे असावें कीं, अवघर्षणानें नाणी जशीं झिजतात तशा ह्या लगडी झिजत नाहीत. नाण्याचा आकार सामान्यपणे वाटोळा असतो अशी आपली दृढ समजूत आहे; पण कधीं कधीं नाणी चतुष्कोणी, षट्कोणी, अष्टकोणी, व चंद्र कोरीच्या आकाराची सांपड तात. पण अगोदर हो नाणी वर्तुळाकृती कशी झाली हे निश्चित सांगता येत