पान:भारतीय चलनपद्धती.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारतीय चलनपद्धति.

कर्धी सोन्यारुप्याचे दागिने असत. पुढे पुढे समाजाची जशी प्रगति झाली त्या मानानें पुष्कळ वस्तूंच्याऐवजी एकच वस्तु प्रचारात येऊं लागली व ती वस्तु म्हणजे लोखंड, तांबे, चांदी किंवा सोनें अशासारखी एखादी धातु होय. लोकांना अशी धातु आवडण्याचें असें कारण दिसतें कीं, इतर वस्तूंपेक्षा धातु सर्वत विकतां येते हा तिचा विशेष होय. पुढे पुढे मनुष्याला संसारांत जास्त द्रव्य खर्च करण्याची आवश्यकता भासूं लागली व वस्तूंच्या किंमती बाढत चालल्या, अशा वेळी सर्वात जास्त किंमतीची धातु प्रचारांत येऊ लागली व अशा रीतीने सोन्याचे महत्त्व प्रस्थापित झालें.

 (४) नाण्याचा आरंभः -पण आतां असा प्रश्न उपस्थित होतो कीं नाण्याचा आरंभ कसा झाला. वर सांगितलेच आहे कीं, प्रथम वस्तु- विनिमयाची साधनें नैसर्गिक पदार्थ असत व हे पदार्थही अनेक असत. पुढे पुढे लोकांना असे वाटू लागले की, ज्या वस्तूंमुळे जिनसा सारख्या प्रमाणांत विकत घेता येतात व निरनिराळ्या रकमेपर्यंत त्या जिनसा विकत घेण्याकरिता ज्या वस्तूंचे विभाग करता येतील त्याच वस्तु प्रचारांत आणलेल्या बऱ्या. अशा वस्तूंचा आकार, परिमाण व रूप जर सारखेच असेल तरच त्यांचा उपयोग होणार हे उघड आहे. आरंभी निरनिराळ्या किंमतींच्या जिनसा विकत घेण्याचे काम एकाच वस्तूचा उपयोग होणे शक्य नसल्यामुळे निरनिराळ्या वस्तु प्रचा- रांत आणाव्या लागत. उदाहरणार्थ, एका विशिष्ट किंमतीचा जिन्नस - धान्य किंवा कापड - विकत घेण्याचें काम जर एखादा बैल किंवा बकरा उपयोगी पडत असला तर याहून कमी किंमतीच्या जिनसा विकत घेण्याकरितां त्याच बैलाचें किंवा बकऱ्याचे कातडें उपयोगांत आणीत असत. कधी कधीं निरनिराळ्या दर्जाची एकच वस्तू निरनिराळ्या किंमतीच्या वस्तु विकत घेण्याचें काम उप योगी पडत असे. उदाहरणार्थ, निरनिराळ्या आकारांच्या रंगांच्या कत्रड्या निर राळ्या किंमतीच्या जिनसा विकत घेण्याचे काम उपयोगी पडत. पुढे हळू हळू एकाच आकाराची व निरनिराळ्या किंमतीचीं नाणीं कृत्रिम उपायाने पाडून प्रचारांत आणण्याची चाल सुरू झाली. अशा तऱ्हेनें द्रव्याला समरूपता व अभि-