पान:भारतीय चलनपद्धती.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उपसंहार.

१२५


आणीत असतांना फक्त चलनी नाण्याच्या बाबतींत दुय्यम तत्त्वांचा अवलंब करीत आहे.

 (२) हिंदुस्थानांत कृत्रिम नार्णे सुरू करण्यांत आल्यामुळे हुंडणावळीच्या भावांत चांचल्य उत्पन्न होऊं नये म्हणून जी सुवर्णगंगाजळी ठेव विला- यतेंत ठेवण्यात आलेली आहे तिचा बराच भाग हिंदुस्थानात ठेवण्यांत आला पाहिजे. चेंबरलेन कमिशनचें मत कांहीही असो, आमची पूर्ण खात्री झालेली आहे कीं, ह्या सोन्याच्या ठेवीचा जर जगांतल्या अत्यंत गरीब अशा देशांतल्या लोकांच्या निढळाच्या घामाच्या पैशापासून जन्म झालेला आहे तर त्या ठेवीचा फायदा येथील लोकांसच झला पाहिजे. हिंदुस्थानांत उद्योगधंद वाढविण्याची अत्यंत अवश्कता आहे व पुष्कळ कला व व्यापार योग्य उत्तेजनाभावी मृत्यु - पंथास लागले आहेत. असे असतांना विलायतेच्या व्यापाऱ्यांना स्वस्त व्या जानें रकमा देऊन हिंदुस्थानच्या उद्योगधंद्याची गळेचेपी करणे हे महत्वाप होय. हिंदुस्थानांत सुवर्ण नाणे सुरू झाल्यावर ह्या सुवर्णनिधीवी जरूरीच भास- णार नाही. पण जोपर्यंत ह्या देशांत सोन्याचे नाणे सुरू होत नाही तोपर्यंत ही गंगाजळी ठेव होतां होईल तो हिंदुस्तानात असली पाहिजे व तिचा उपयोग येथील व्यापायांस झाला पाहिजे.

 (३) स्टेट सेक्रेटरीने ज्या हुंडय। विकावयाला काढावयाच्या त्या त्यानें आपल्या गरजेपुरत्याच काढिल्या पाहिजेत. विलायती व्यापान्यांची सोय पहाण्याचें त्याचे काम नाहीं. हिंदुस्थानला त्याचा बाहेर जाणारा माल आयात मालापेक्षां केव्हाही जास्त असल्यामुळे इतर राष्ट्राकडून पैसा घ्याव याचा असतो; व स्टेट सेक्रेटरीचा ३१ कोट रुपये खर्च भागल्यावर बाकीचा जो पैसा ह्या देशाला घ्यावयाचा असतो तो पैसा स्टेट सेकेटरीनें फाजील हुन्या विकावयास न काढल्या तर सोन्याचें रूपानें येथें येईल. ह्या सोन्याचे जोरावर सोन्याचें नाणें सर्रास सुरू करता येईल व आपोआप खन्या स्वरूपाचा सुवर्ण- निधि निर्माण करता येईल. इल्ली स्टेट सेक्रेटरी वाजवीपेक्षां फाजील हुंडया विकीत असतो ह्याचे कारण हिंदुस्थानास बाहेरच्या राष्ट्रांकडून सोने मिळू नये ही याची इच्छा होय. हे धोरण सर्वस्वी अनिष्ट होय हे सांगणे अनवश्यक आहे.