पान:भारतीय चलनपद्धती.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२४
भारतीय चलनपद्धति.

लोकांच्या सोयीकडे पाहून प्रचारांत आणली गेलेली आहे. हिंदुस्तानांत अस लेली महागाई खरी नसून हिच्या मुळाशीं कांहीं अंशीं हो सदोष चलनपद्धतीच आहे. तसेंच ह्या अशास्त्रीय चलनपद्धतीमुळे हिंदुस्थानचे क्रोडो रुपये निष्कारण खर्च होत आहेत व हिंदुस्थानांत जें सोनें हक्कानें अले असतें तें विलायतेत सुवर्ण गंगाजळी ह्या गोंडस नांवाखाली गडप होत आहे. ही सर्व स्थिति जर बदलावयाची असेल तर खाली सुचविलेल्या सुधारणा जरूर झाल्या पाहिजेत.

 (१) हिंदुस्थानांत एक तर द्विचलनपद्धति सुरू करण्यांत यावी किंवा निर्भेळ सुवर्ण चलनपद्धति प्रचारांत आणावी. हिंदुस्थान देश इतर देशांप्रम र्णेच सुधा- रलेला आहे. जगांतील प्रमुख राष्ट्रांचा जो एवढा उत्कर्ष झाला आहे त्यांचें कारण काय आहे हे त्यास पूर्णपणे समजतें. हिंदुस्थानचे लोक रानटी आहेत, त्यांना सोन्याचा उपयोग फक्त दागिने करण्यापुरतांच समजतो, हिंदुस्थान देश हा सोने गडप करणारी एक मोठी गर्ता आहे; ह्या कल्पना आतां सरकारने सोडून दिल्या पाहिजेत, व गोल्डएक्सेंजस्टँडर्ड पद्धतीला मूठमाती दिली पाहिजे. प्रथम रुपयाचें नाणे चालू असताना एकदम सोन्याचे नाणे सुरू केले तर घोटाळा उत्पन्न होईल; तो टाळण्याकरितां ही गोल्डएक्सेंजस्टँडर्ड पद्धति तात्पुरती हिकमत म्हणून अमलांत आणण्यात्र हरकत नाहीं; पण ही पद्धति कायमची एखाद्या देशावर लादणे म्हणजे त्या देशाला आर्थिक दृष्ट्या कायमचें खच्ची करण्यासारखे आहे. ही पद्धति सदोष आहे असे केवळ हिंदुस्थानचेच लोक म्हणत नाहीत, तर खुद्द हिंदुस्थान सरकारचें मतही १८९८ सालापर्यंत तसेच होतें; व विलायतेच्या व्यापारी वर्गांचें व सरकारचें दडपण जर स्टेट सेक्रेटरीवर पडले नसते तर ह्या देशांत सुवर्णचलनपद्धति केव्हांच सुरू झाली असती. ह्या बाबतींत सर रिचर्ड टेंपल साहेबांचे मत नमूद करण्यासारखे आहे. ‘माझें असें बरेंच दिवसांपासून मत झालेले आहे की, हिंदुस्थानांत हळू हळू कां होईना सोन्याच्या नाण्याची सुरवात झाली पाहिजे व ह्याच दृष्टीनें हिंदुस्थान सरकारनें उपाय योजले पाहिजेत. एकंदरीत मला असे दिसतें कीं, हिंदुस्थान सरकार राज्यकारभाराच्या प्रत्येक खात्यांत सर्वोत्कृष्ट अर्शी तत्वें अमलांत