पान:भारतीय चलनपद्धती.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उपसंहार.

१२३


 असो. कोळसा उग ळावा तितका तो काळाच असतो. स्पष्ट सांगावयाचें म्हणजे सरकारने हा जो दर १६ पेन्स गसून २४ पेन्सपर्यंत वाढविला ह्याचे अंतस्थ कारण असें होतें कीं, महायुद्धामुळे प्रत्येक राष्ट्रांत बराच माल तुंबुन राहिला होता. इंग्लंडमध्ये डांबून राहिलेल्या मालास युरोपमध्ये त्यावेळी मागणी नसल्यामुळे मँचेस्टर, लिव्हरपूल येथील गिरण्या राम म्हणण्याचे पंथाला लागल्या होत्या. त्यांच्या मालाला गिन्ह ईक मिळवू दिले नाही तर त्यांची फार कठोण स्थिति होणार होती. म्हणून हा दर चढवून त्या शिल्लक राहिलेल्या मालाला हिंदुस्थानांत व्यापा-यांकडून सरकारने मागणी करावयास लावले. पण खरी मोज तर पुढेच आहे. अशी मागणी सुरू होऊन बराच माल उठल्यावर तो मुंबईच्या धक्क्याला लागतांक्षणींच चांदीचा भाव उतरूं लागल्यामुळे पुनः १६ पेन्सवर दर येऊन ठेपला व तेथील व्यापारी सपशेल तोंडघशी पडले. कारण त्यांना आतां १० रुपयेबद्दल पूर्वीप्रमाणेच १५ रुपये द्यावे ल गणार होते. अशा रीतीनें नवीन दराचा फजीतवाडा उडाल्यामुळे सरकारास विलायतेत स्टेट सेक्रेटरीवर उलट हुंड्या विकाव्या लागल्या व ३५ कोटींची चाट बसल्यावर मग ह्या हुंड्या न विकण्याचे सरकारने ठरविलें.

भाग ११ वा.

--

उपसंहार.


 (७३) चलनपद्धतीबद्दल सरकारास कांहीं महत्त्वाच्या सूचना:- अशा प्रकारचा हा चलनी नाण्यांचा मनोरंजक इतिहास आहे. हिंदुस्थानांत ह्या चलनी नाण्याला फार महत्व आलेले आहे; कारण येथील चलनपद्धति हिंदुस्थानच्या हिताच्या दृष्टीने सुरू करण्यांत आलेली नसून विलायतसरकारव्या व तेथील