पान:भारतीय चलनपद्धती.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युद्धकालीन परिस्थिति.

१२१


२४ पेन्स करण्याचे कांहीं एक कारण नव्हतें. हिंदुस्थानांत हल्लों रुपयाचें कृत्रिम नाणे सुरू आहे. केवळ नाणे कृतेम आहे म्हणून कोणी त्या नाण्यास त्याज्य मानीत नाही. तुम्ही नाण्यास कोठलीही किंमत द्या, त्यामुळे जोपर्यंत ते नाणें देशांतल्या देशांतचालू आहे तोपर्यंत कोणाचेही होत नाहीं. नुकसान पण एकदां तें नाणें लोकांत प्रचलित झाल्यावर व लोकांचा त्या नाण्याशों निकट परिचय झाल्यावर मग त्याची किंमत कमीजास्त करणे हैं मोठं पाप आहे. विशेषतः ज्यावेळी अर्श किंमत बदलल्याने सरकारचा फायदा होत असतो त्यावेळी तर सरकार लोकांशी मोठीच प्रतारणा करते. आपण अशी कल्पना करूं कीं, एक दुकानदार आहे व त्याला गिन्हाइकाला फसवावयाचे आहे. तेव्हां त्याचा सीधा मार्ग म्हटला म्हणजे खेटों व लहान वजने वापरून गि इाइकांचे पदरांत कमी माल घालणे हा होय. अतां त्याच दुकानदाराला काहीं माल दुसऱ्या एका खेडेगांवच्या शेतकऱ्याकडून घ्यावयाचा आहे व त्याचे मनांत त्या शेतकन्याला लुबाडावयाचें आहे. तेव्हां उत्तम मार्ग म्हटला म्हणजे खोटे व मोठे माप वापरून जास्त माल शेतकऱ्याकडून उपटणें हा होय. हाच न्याय जर आपण हिंदुस्थान सरकाराला लावडा तर अपगोस असे दिसून येईल की, हिंदुस्थान सरकारला स्टेट सेक्रेटरीस दरवर्षी १ साव्हरिनला १५ रुपये या दराने ३१ कोट रुपये द्यावयाचे असतात; पण साव्हरिनास १० रुपये ह्या दरानें आतां २० कोटच रुग्ये त्याला द्यावे लागणार; म्हणजे दरवर्षी ११ कोट रुपयांची बचत हिंदुस्थान सरकारास होणार. हे सर्व सरकारच्या दृष्टीनें ठीक झालें; पण ज्याला परदेशीय व्यापाऱ्यांकडून पैसे घ्यावयाचे असतील. त्याची वाट काय ? पूर्वी त्याला एका साहरिनला १५रुपये मिळत होते, तर आतां त्याला १० रुपयेच मिळणार; म्हणजे जो फायदा सरकारचा होणार तोच तोटा धान्य वगैरे माल उत्पन्न करणान्या-व असे लोक हिंदुस्थानांत शेकडा ८० आहेत-शेतक-यांचा होणार. शिवाय ज्याला सावकाराला पैसे द्यावयाचे आहेत, स्याची वाट काय ? कारण पूर्वी १ रुपयाला त्याला १६ पेन्स द्यावे लागत असले, तर आतां त्याला २४ पेन्स द्यावे लागणार.

 हा हुंडणावळीचा भाव बदलल्याने दुसरा असा एक परिणाम होणार