पान:भारतीय चलनपद्धती.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
नाण्याविषयी सामान्य विचार.


अर्थातच पैशाची जरूरी ठळकपणें भासूं लागली; व असा व्यापार करीत अस तांना जी वस्तु निसर्गतः महत्त्वाची व व्यवहारांत उपयोगाची असेल तिचा, उपयोग करण्याचे त्यांनी ठरविले असावें. अशी वस्तू म्हणजे लोखंड, रूपे जिन्नस होत. ' कांही लोकांचे मतें अरिस्टॉटलचें हें म्हणणे अक्षरशः खरे नाही. प्रथम वस्तूंनी वस्तू विकत देणें घेणें, नंतर वस्तूंची किंमत ठरवितांना द्रव्याचा उपयोग करणे, नंतर पतीवर व्यवहार करणे असा कम जो कांहीं लोक देत असतात तो बरोबर नाही. कारण व्यवहारांत पैशाचा उपयोग करण्याचें लोकांनी आपसांत ठराव करून निश्चित केले असे मानणे चुकीचे होईल. त्याच प्रमाणे वस्तूंची अदलाबदल करण्याची एक पद्धत संपल्यावर दुसरी सुरू झाली, नंतर तिसरी सुरू झाली असे म्हणणे इतिहासास सोडून आहे. वस्तुस्थिति अशी आहे कीं, वर सांगितलेले तिन्ही प्रकार मूळ स्वरूपति प्रथमपासूनच होते व भोवताळच्या परिस्थितीप्रमाणे त्या प्रकारांची वाढ आजपर्यंत कमीजास्त झालेली आहे. कसेंही असो. एवढी गोष्ट निश्चित आहे कीं, प्रथम वस्तूंची अदलाबदल वस्तूंनीच करण्याची पद्धत जोरात होती, पण ही पद्धति गैरसोयीची व त्रासाची आहे असे लोकांस कळून येऊं लागले. एखाद्या मनुष्याजवळ कापड आहे व त्याला धान्य हवें आहे. ते संपादन करण्यास त्यानें असा मनुष्य शोधून काढिला पाहिजे कीं, ज्याच्याजवळ धान्य आहे व ज्याला कापडांची जरूरी आहे. असा मनुष्य सांपडेपर्यंत त्याला थांबावें लागणार. तेव्हां जी वस्तु सर्वोसच महत्त्वाची वाटते व जिच्या मदतीनें वाटेल तो जिन्नस घेत येईल अशी वस्त जर विनिमयसाधन म्हणून प्रचारांत येईल तर तें सर्वासच सोयीचे होईल. अशी वस्तु एकदमच कांही चांदी किंवा सोनें म्हणून निश्चित. झाली नाहीं. प्रथम प्रथम इतर वस्तूंपेक्षां ज्या वस्तूला जास्त मागणी किंवा महत्व असे तीच वस्तू जिनसांची अदलाबदल करण्याचे साधन म्हणूस प्रचारांत भाली. अशी वस्तु कोहीं. एकच नसे. ही वस्तु कर्धी व्यवहारांत लागणाच्या नित्य वस्तूंपैकी एक असे, तर कध शरीरास विभूषित करणार | दागिना असे. हे दागिने सोन्यारुप्याचेच असत असें नाहीं. मनुष्य ज्या मानानें सुधारलेला असे त्या मानानें कधीं जनावरायें कातर्डे तर कधीं कवड्या व