पान:भारतीय चलनपद्धती.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युद्धकालीन परिस्थिति.

११९


उतरत चालले आहेत व त्यामुळे लोकांना फायदा होत आहे व हा फायदा कायम राखणे इष्ट आहे; कारण लढाईमुळे भयंकर महागाई झाल्यामुळे लोकांत सरकाराविषयीं तीव्र असंतोष माजत चालला आहे व येथील चळवळ्या लोकांना सरकारविरुद्ध द्वेष पसरविण्यास चांगले साधन झालेले आहे. तेव्हां ही राजकीय चळवळ जर हाणून पाडावयाची असेल तर ही महागाई कमी झाली पाहिजे, व ती कमी होण्यास बाहेरचा माल ह्या देशांत स्वस्त भावानें विकला गेला पाहिजे, म्हणजे देशांतला माली व्यापारी लोक स्वस्त दराने विकूं लागतील. चांदीचा भाव बदलण्यानें जिनसांच्या किंमती कमी होण्याचें कमेटीच्या मतें अर्से कारण होतें कीं, पूर्वी येथील लोकांस एक पौंड किंमतीच्या मालास जे १५ रुपये द्यावे लागत त्याबद्दल त्यांना आतां १० रुपयेच नवीन दराने द्यावे लागतील. आतां ही गोष्ट खरी आहे की, ज्या लोकांना त्या देशांतून माल बाहेर पाठवावयाचा असेल त्यांना आपल्या मालावर जास्त किंमत आकरावी लागेल; कारण त्यांना पूर्वी एका साव्हरिनबद्दल पंधरा रुपये मिळत होते ते आतां दद्दाच मिळणार; व त्यामुळे त्यांच्या मालाला बाहेर मागणी कमी येईल. पण ह्यावर कमेटीचें असें मत पडले की, ही स्थिति फार दिवस टिकणार नाही. शिवाय हिंदुस्तानच्या मालाशिवाय परराष्ट्रीय चालत नसल्यामुळे त्या मालाला मागणीही येणारच व हल्लीच हिंदुस्तानच्या मालाला बाहेर इतकी किंमत येत आहे कीं, रुपयाची किंमत २४ पेन्स केल्यामुळे जे नुकसान होईल तें फारसें होणार नाहीं. एकंदरीत सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीने ह्या नवीन दराने फायदा होणाऱ्या लोकां- चीच संख्या अतिशय भरेल. आणि माल उत्पन्न करणाऱ्या लोकांचें जरी नुकसान झाले तरी हिंदुस्तानांत विलायतेच्या मानाने मजूरी व कच्चा माल स्वस्त अस ल्यानें येथें जो माल तयार होईल तो युरोपांत स्वस्त दराने विकणे केव्हाह येथील व्यापायांस परवडेल.

 (७२) वरील सूचनांबद्दल चर्चा- अशा प्रकारची १ रुपयाची किंमत २४ पेन्स करण्याची ह्या कमेटीची विचारसरणी आहे. पण आपण जर सूक्ष्मपर्णे विचार केला तर ती किती फोल आहे हे सहजच दिसून येईल. तथापि