पान:भारतीय चलनपद्धती.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युद्धकालीन परिस्थिति.

११७


वाढण्याची अनेक कारणे होती. ह्या कारणांचा विचार मांगे केल्यामुळे त्यांची द्विरुक्ति आम्ही येथे करीत नाही. चांदीची किंमत वाढतां वाढतां १९१९ च्या आक्टोबर महिन्यांत एका औंसाला ६६२ पेन्स पडूं लागले व १९२० च्या फेब्रुवारीत ही किंमत ८९ पेन्सपर्यंत गेली. लढाईचे पूर्वी ह्याच चांदीचा भाव ४४ पेन्स होता. तेव्हां अर्थात् रुपये व्यवहारांत वापरण्यापेक्षां ते आटवून त्यांत मिळणारी चांदी विकणे फायदेशीर होऊं लागलें; रुपये दुर्मिळ होऊं लागले व एक रुपया व अडीच रुपये किंमतीच्या नोटांचा सुकाळ झाला. १९१५ साली एकंदर नोटा ६०.२६ कोटि रुपयांच्या होत्या, तर १९१९ साली सप्टेंबर महिन्यांत १०८ कोटींपर्यंत ही नोटांची वाढ झाली. असो. सांगावयाचे तात्पर्य असे की, चांदीची किंमत खूप वाढल्यामुळे रुपया है कृत्रिम नाणें असे न समजतां अस्सल नाण्याहून त्याची योग्यता जास्त आहे असे अनुभवास येऊं लागलें; व नवीन रुपये पहिल्याच दराने पाडणें म्हणजे आंतबट्टयाचा व्यवहार आहे अशी सरकारची खात्री झाली.

 (७०) गंगाजळी ठेव व हुंडणावळीचा दरः- आतां प्रश्न असा उपस्थित होतो की, हुंडणावळीच्या भावांत जर चलबिचल होऊं लागली तर तो विलायतेमधील गंगाजळी ठेवीच्या साहाय्यानें स्थिर ठेवणें हें स्टेट सेक्रेटरीचें काम नाहीं काय ? रुपया है कृत्रिम नाणे करून त्या रुपयापासून होणाच्या नफ्यापासूनच जर ह्या गंगाजळी ठेवीचा उगम आहे तर ह्या रुपयामधील चांदीचा भाव वाढल्यामुळे पूर्वीचा १६ पेन्स भाव कायम रहात नसेल तर त्या गंगाजळींतून सोने काढून पूर्वीचा भाव सरकारनें कायम ठेविला पाहिजे. ह्यावर सरकार पक्षीय लोकांचे असे म्हणणे आहे की, हा सुवर्णनिधि निर्माण कर- ण्याचा हेतू एवढाच आहे की, ज्या वेळी निर्गत मालापेक्षां आयात माल देशांत जास्त होता व त्यामुळे हुंडणावळीचा भाव उतरूं लागतो, त्यावेळी स्टेट सेक्रेटरीला आपल्या हुंडया विकण्याचे काम कांहीं वेळ बंद ठेवता येऊन खजि न्यांत जी तूट येईल ती ह्या गंगाजळींतून भरून काढतां यावी; तसेंच हिंदु- स्थान सरकारला हा हुंडणावळीचा भाव कायम ठेवण्याकरितां स्टेट सेक्रेटरीवर