पान:भारतीय चलनपद्धती.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११६
भारतीय चलनपद्धति.

आहे की, सरकारला प्रसंग पडेल त्याप्रमाणे रुपयांचा व सोन्याचा पुरवठा करणे भाग पडतें व कर्धी स्टेट सेक्रेटरीला तर कधीं हिंदुस्तान सरकारला हुंडया विकाव्या लागतात. ज्या वेळीं हिंदुस्थानांतून माल बाहेर जात असतो व तो आयात मालापेक्षा जास्त असतो तेव्हां सर्व कांहीं सुरळित चालतें; पण ज्यावेळी निर्गत मालापेक्षा आयात माल जास्त येतो व व्यापारमंदीमुळे किंवा सांपत्तिक अडचणीमुळे किंवा चांदीचा भाव वाढल्यामुळे सरकारला रुपयाची कृत्रिम किंमत कायम ठेवणे कठिण जाऊं लागतें त्यावेळी या गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डचा बोज- वारा उडून जातो व लोकांचे अतोनान नुकसान होतें. ह्या धेडगुजरी स्टँडर्डला दोन्हीकडून भीति असंत. आयात मालापेक्षां निर्गत माल जास्त झाला म्हणजे विलायतेच्या व्यापाऱ्यांना हिंदुस्थानांत पैसे पाठवावे लागतात; व होतां होईल तों सोनें पाठवावयाचें नाहीं व हिंदुस्तानांतील व्यापाऱ्यांना रुपये द्यावयाचे अस धोरण निश्चित असल्यामुळे रुपयांची मागणी जोरानें सुरू होते, तितके रुपये शिल्लक नसल्यामुळे हुंडणावळीचा भाव वाढूं लागतो व कधी कधीं सरकारला हुंडयाच कमी विकर्णे भाग पडतें. बरें, निर्गत मालापेक्षा आयात माल जास्त झाला तर येथील बाहेरून माल आणणाच्या व्यापाऱ्यांना पुरेशा हुंडया मिळत नाहींत; म्हणून त्यांना सोने विकत घेऊन तें विलायतेच्या व्यापाऱ्यांना पाठवावें लागतें व तें तर दुर्मिळ होतें; म्हणजे १ रुपयास १६ पेन्स देणें न परवडल्यामुळे हुंडणावळीचा भाव उतरूं लागतो. तेव्हां दोन्ही दृष्टीनें ह्या प्रचलित 'गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डला ' धोकाच आहे.

 (६९) युद्धामुळे झालेली चांदीच्या किंमतीची भयंकर वाढ:- ह्या 'गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड ' चे जे पुरस्कर्ते आहेत त्यांची अशी एक ठाम समजूत होती की, एका रुपयांत असलेल्या चांदीची किमत कधींही वाढ- णार नाहीं. निदान सरकारने ठरविलेल्या १६ आण्यांच्या किंमतीहून जास्त तर ती कधींही होणार नाहीं; कारण जगांत चांदीला महत्त्व फक्त चीन व हिंदुस्थान ह्या दोन देशांतच आहे. पण महायुद्धामुळे जे चमत्कार घडून आले त्यापैकी चांदीच्या किंमतीची वाढ हा एक चमत्कार आहे. ही चांदीची किंमत