पान:भारतीय चलनपद्धती.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युद्धकालीन परिस्थिति.

११५


बिकल्यावर जो पैसा स्टेट सेक्रेटरीस मिळतो त्याचा विनियोग, नित्याचा खर्च करणे किंवा ज्यावेळी हिंदुस्तानांतील ' पेपर करन्सी' व 'गोल्ड स्टँडर्ड ' ह्या दोन्ही रिझव्हमधून स्टेट सेक्रेटरीनें विकलेल्या हुंड्या पटविल्या जातात त्यावेळीं विलायतेमधील ह्या रिझव्र्व्हमध्ये, जितक्या रकमेच्या हुंडया हिंदुस्थानांत पट• विल्या असतील तितक्या किंमतीच्या रकमेची भरती करणे, किंवा कायमच्या ब तात्पुरत्या कर्जाची फेड करणे वगैरे गोष्टींकडे करण्यांत येतो.

भाग दहावा.

-:-X¢X-:-

युद्धकालीन परिस्थिति.


 (६८) सुवर्णविनिमयपरिमाणपद्धति व तिला असलेले धोकेः- पूर्वी एकदां सांगण्यात आलेच आहे की, हिंदुस्थानांत आंत- र्व्यवहारांत रुपयांचा उपयोग करण्यांत येतो व परराष्ट्रांना पैसा देतांना तो सोन्याच्या रूपाने दिला जातो. तसेच हिंदुस्थानांत रुपयाचे नाणे कृत्रिम आहे. अशी परिस्थिति असल्याने सरकारला कृत्रिम तऱ्हेने ठरविलेला १ रुपयाला १६ पेन्स हा भाव कायम ठेवण्याकरितां जिवापाड खटपट करावी लागते. वास्तविक पाहिले असतां दोन देशांमध्ये पैशाची अदलाबदल करतांना हुंडणावळीचा भाव व्यापारी परिस्थितीव ठरला पाहिजे. तो निश्चित करण्यांत सरकारने मध्यें पडता कामा नये व ज्या देशांत सोन्याचे नाणे आहे त्या देशांत परस्पर पैशाची अदलाबदल होत असतांना सरकारला हात घालण्याची जरूरी पडत नाही. पण हिंदुस्तानांत होतांहोईल तो सोनें राहूं नये अशी सरकारची इच्छा असल्यामुळे येथें गोल्ड स्टँडर्ड सुरू करण्यात येत नाही; व त्याचा असा परिणाम झाला