पान:भारतीय चलनपद्धती.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११२
भारतीय चलनपद्धति.

इन्स्यूअर करण्यास लागणाऱ्या खर्चावर अवलंबून असतें. तेव्हां आमची एकंदरति अशी सूचना आहे की, सरकारनें बाजार भावानेच हुंडया विकावयास काढाव्यात व जर ह्यांत तोटा होत असेल तर रोख पैसे पाठवावेत.

 (६५) १९१६ सालचा हुंडणावळीचा दरः- १९१६ सालीं हुंडणावळीचा भात्र वाढण्यापूर्वी ह्या हुंडयांचा दर रुपयास १५३३ पेन्स होता. व तारेनें ज्या हुंड्याबद्दल पैसे मिळवावयाचे त्या हुंडयांचा दर १५१३ पेन्स होता. हिंदुस्थानांतल्या बँकांचा दर जोपर्यंत शेकडा आठ ह्याप्रमाणे वाढत नसे तोंर्येत ह्याच हुंडया अमर्याद प्रमाणांत १६८ पेन्स व टेलिग्रॅफिक ट्रॅन्स- फर १६ ३३ पेन्स ह्या दरानें विकल्या जात; व बँकांचा दर जेव्हां शेकडा • हून जास्त वाढे तेव्हां रुपयास १६१३६ त्या दरानें त्या हुंडया विकल्या जात असत. १९१६ सालच्या अखेरीससुद्धा आठवडया ८० लाखपर्यंत हुंडया मर्यादित करण्याचें स्टेट सेक्रेटरीनें ठविले; तरी टेलिग्रॅफिक ट्रॅन्सफरचा भाव १६३३ पेन्स व 'डिफर्ड' चा व हुंड्यांचा भाव १६८ पेन्स हाच त्याने ठरविला.

 (७६) आयात निर्गत मालांचा एकंदर किंमतींतील अनु- कूल प्रतिकूल फरकः - वर एकदां असा उल्लेख करण्यांत आला आहे की, एखाद्या देशांत आयातं मालापेक्षां निर्गत माल जर जास्त असेल, तर तेथे व्यापाराची स्थिति समाधानकारक मानण्यांत येते. पण जर आयात माल निर्गत मालापेक्षा जास्त असेल, तर तेथे अर्थात व्यापाराची स्थिति समाधानकारक नाहीं असे मानण्यांत येतें. हे नियम सामान्यपणे बरोबर आहेत. पण ते सर्वत्र लागू पडत नाहीत. उदाहरणार्थ, इंग्लंडचाच व्यापार घ्या. त्या देशांत आयात माल नेहमीं निर्गत मालापेक्षा जास्त असतो, तरी पण तेथे व्यापाराची स्थिति समाधानकारक नाहीं असे कोणी समजत नाहीं; कारण हा जास्त आयात माल म्हणजे इंग्लंडनें जी इतर राष्ट्रीस आर्थिक मदत दिलेली असते तिचा मोबदला होय, अशी वस्तुस्थिति आहे. उलट आपण हिंदुस्थानचे उदा- हरण घेऊं. ह्या देशाचा निर्गत माल जरी जास्त असला तरी सर्वच जास्त निर्गत मालाबद्दल ह्या देशाला परदेशच्या व्यापायाकडून पैसे मिळतात असे थोडेंच