पान:भारतीय चलनपद्धती.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्टेट सेक्रेटरीनें विकावयास काढलेल्या हुंडया.

१११


स्टेट सेक्रेटरी १ रुपयास १६८ पेन्स ह्या दरानें हुंड्या विकावयास काढीत असे. १९०७-८ साली चिंताजनक परिस्थिति उलटून गेल्यावर १९०९ साली लंडन शहरांतील ‘गोल्ड स्टँडर्ड रिझर्व्हमधील कमी झालेलें सोनें पुनः भरून काढण्या- करितां स्टेट सेक्रेटरी नें हुंड्या विकल्या. हेतु अश कीं, पुनः जर हुंडणावळीचा भाव उतरला तर पुनः तो स्थिर करण्यास ह्या सोन्याचा उपयोग व्हावा.

 ६४ चेंबरलेन कभिशनच्या सूचना:- चेंबरलेन कशिशन में हुंड्या विकण्याच्या बाबीसंबंधानें अशी टीका केली होती की, ज्या वेळीं वस्तुत: स्टेट सेक्रेटरीला सोन्याची जरूर नसते त्यावेळींमुद्धां तो विनाकारण स्वस्त दरानें हुंड्या विकतो; तरीपण मागे सांगितलेल्या सुवर्ण मर्यादेंच्या आंत ( गोल्ड पाइन्ट ) जर तो ह्या हुंड्या विकीत असेल तर अमक्याच किंमतीच्या किंवा अमक्याच दराने स्टेट सेक्रेटरीनें हुड्या विकाव्यात असे निर्बंध आपण घालूं इच्छित नाहीं. कमिशनचे मत सरकारने एका ठराविकच दरानें नेहमी हुंड्या विकण्याच्या विरुद्ध होतें. ह्याचें कारण कमिशनने असे सांगितले कीं, असा एक दर ठरवून टकला तर स्टेट सेक्रेटरीला हुंडणावळीच्या बजःरांत एक प्रकारचा नक्काच मिळाल्यासारखे होईल; शिवाय बाराही महिने सर- कारला ठराविक दानें हुड्या विकर्णे परवडेल किंवा नाहीं हा एक प्रश्नच आहे. असा एकच दर ठरविल्याने हुंड्या विकण्याच्या बाबतीत अनिश्चितपणा येऊं लागेल व त्यामुळे हिंदुस्तानांत खजिन्यांत जास्त शिल्लक ठेवावी लागेल.

 कधीकधी कांहीं लोक अशीही सू ना करितात कीं, स्टेट सेक्रेटरीने ठराविक दरापेक्षा कमी दरानें कधींही हुंड्या विकूं नयेत; पण कमिशननें असें मत दिलें कीं, ही सूचना मान्य केली तर असा फायदा होईल कीं, हुंडणा- चळच्या दराचे कमीजास्त होण्याचें मान बरेच कमी होईल; एकंदरीत ही सूचना बरी आहे. कारण इल्ली स्टेट सेक्रेटरी कमीजास्त दरानें हुंडया विकत असल्यामुळे या दरांत फरक बराच पडत असतो; एवढेच नव्हे तर त्यामुळे हिंदुस्थान व इतर देश ह्यांमध्ये भांडवल हवें तसे खेळत नाही. तरीपण हुंडणावळीचा दर हा अमकाच असावा असे कायद्यानें ठरविणे इष्ट नाहीं. हुंडणावळीचा दर कमीजास्त होणें हें हिंदुस्थानांत पैसे पाठविण्यास व ते