पान:भारतीय चलनपद्धती.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
2
भारतीय चलनपद्धति.

हल्ली हिंदुस्थानची जी विपन्नावस्था आहे तिचीं अनेक कारणे आहेत. या कारणांपैकी आमच्य मतें एक कारण असे आहे की, येथील चलनपद्धति अशास्त्रीय अतएव अनिष्ट आहे. ही 'सुवर्णविनिमयपरिमाणपद्धति' काय आहे, ही अशास्त्रीय कां व कशी आहे ह्याबद्दल सविस्तर विवेचन पुढे येईलब. पग या विवेचनाचें जर समग्र ज्ञान व्हावयाचें असेल तर चलनपद्धतीच्या मूलभूत तत्त्वांची थोडीफार माहिती सामान्य वाचकांस होणें जरूर आहे म्हणून तशा प्रकारची माहिती आम्ही खाली देत आहोत.

(२) नाण्याची आवश्यकताः - प्रत्येक देशांत चलनपद्धति ही सरका. रच्या धोरणानें प्रचलित झालेली असते. त्या चलनपद्धतीची आवश्यकता काय आहे असा जर प्रश्न केला तर आपणांस असे उत्तर द्यावे लागेल कीं, सरकारला आपल्या प्रजेकडून दर वर्षी सारा वसूल वा लागतो. हा सार किंवा कर एक तर ठराविक नाग्य च्या रूपाने किंवा धान्य वगैरे वस्तूंच्या रूपाने लोक सरका रास देऊं शकतात. पण सरकारास सारा किंवा कर द्यावा लागतो एवढ्याच करितां कांहीं नाण्याचा जन्म झालेला नाहीं. लोक जेव्हां व्यापार सुरू करतात तेन्हांसुद्धां वस्तूंची किंमत ठरविण्याकरितां विवक्षित नाण्याची आवश्यकता भासू लागते.

(३) नाण्याच्या पूर्वेतिहासाबद्दल अरिस्टॉटलची कल्पना व तिजवर चर्चा:- पण ही किंमत ठरविण्यास विवक्षित किंमतःचें नाणे जरी सोयीचें असले तरी व्यापार बाल्यावस्थेत असतांना ही नाण्याची कल्पना अस्तित्वांत नव्हती. पूर्वी लोक वस्तूंनी वस्तू विकत देत घेत असत. त्याच पद्धतीला इंग्रजीत 'बार्टर' ही संज्ञा आहे. प्रसिद्ध प्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल यानें' राजनीतिशास्त्र' नौवाच्या ग्रंथांत असे स्पष्ट म्हटले आहे कीं, 'प्रथम वस्तूंची अदलाबदल वस्तूंनींच होत असे; नंतर वस्तूंची किंमत नाण्याचे रूपांत ठरविण्याची पद्धत सुरू झाली. ज्यावेळी एका देशांतील लोक स्वतःच्या उपजीविकेकरितां दुसन्या देशाच्या लोकांवर अवलंबून राहूं लागले व आपणांस लागणारा माल बाहेरून आणून आपली गरज भागून उरलेला माल बाहेर पाठवूं लागले तेव्हां