पान:भारतीय चलनपद्धती.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०८
भारतीय चलनपद्धति.

काढून जे सोनें मिळेल त्यावर चांदी खरेदी करून तिचे रुपये पाडण्याकरितां तो ती चांदी हिंदुस्थानांत पाठवून देतो. हिंदुस्तानचा निर्गत माल आयात मालापेक्षां नेहमी जास्त असतो, त्यामुळे येथील व्यापाऱ्यांना विलायतच्या व्यापाऱ्यांकडून नेहमीं पैसे घ्यावयाचे असतात; तेव्हां विलायतच्या व्यापाऱ्यांना थोडया खर्चात हिंदुस्थानांत रक्कम देतां यावी म्हणून स्टेट सेक्रेटरी वाजवीहून फाजील हुंडया विकावथाला काढीत असतो. ज्या वेळी व्यापार तेजीमध्ये असतो त्या वेळीं विलायतच्या व्यापायांना इकडे जास्त रक्कम पाठवावयाची असते व ह्या वेळीं स्टेट सेक्रेटरीने विकावयास काढिलेल्या हुंडया विकत घेण्याची विलायतच्या व्यापायांमध्ये अहमहमिका चालू असते. अशा वेळी अर्थात्च हुंडळावळांचा भाव चढत असतो व ज्या वेळी व्यापार मंदावला असतांना निर्गत माल फारच कमी असतो, त्या वेळी विलायतेचे व्यापारी ह्या हुंडया घेण्यास फारखे उत्सुक नसतात; त्यामुळे अर्थातच हुंडणावळीचा दर उतरतो. जोपर्यंत टांकसाळी लोकां- करतां खुल्या होत्या, तोपर्यंत हिंदुस्थानांत चांदी वाटेल तेवढी येत असे व स्टेट सेक्रेटरीला हुंडणावळीचा दर फारसा वाढवितां येत नसे; पण आतां टांक- साळी बंद झाल्यामुळे हिंदुस्थान सरकारच्या हातांत रुपये पाढण्याचे बाबतींत पूर्ण सत्ता आलेली आहे व त्याचा असा परिणाम झाला आहे की, विलायतेच्या व्यापाऱ्यांनी एक तर स्टेट सेकेटरीनें विकावयास क ढलेल्या हुंडया विकत घ्याव्यात किंवा साम्हरिन पाठवावे. कधीं कधीं हिंदुस्थान सरकार स्टेट सेक्रेटरी - वर उलट हुंडया काढीत असते. ज्या वेळी निर्गत माल कमी होतो व आयात माल जास्त असतो, किंवा येथील व्यापारी व गोरे अधिकारी त्यांना आपले पैसे विलायतेंत पाठवावयाचे असतात, त्या वेळी त्यांचे सोयीकरतां हिंदुस्तान सरकारास ह्या हुंडया स्टेट सेक्रेटरीवर काढाव्या लागतात.

 (६२) स्टेट सेक्रेटरीच्या हुंड्यांचा पूर्वेतिहासः - हिंदु- स्थाननें विलायतेमध्ये पाठवावयाचे पैसे थोड्या खर्चात कसे पाठवावे, हा प्रश्न १९ व्या शतकाच्या प्रारंभापासून सरकारसमोर आहे. १८१३ सालापासून कोर्ट ऑफ डायरेक्टर्स ह्या प्रश्नाचा विचार करीत होतें. डायरेक्टरनी येथील सर