पान:भारतीय चलनपद्धती.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्टेट सेक्रेटरीनें विकावयास काढलेल्या हुंड्या.

१०७


असतां वस्तूंची किंमत रुपयांत घेण्यांत येत असते व १८९३ सालाच्या अगो- दर तर त्या देशांत रुपया हेच मुख्य नाणें होतें. इतर देशांतून चांदीची हकाल- पट्टी झाल्यामुळे ह्या देशांत चांदीचा भाव उतरूं लागला व हिंदुस्थानला जेव्हां सोन्याचे नाणे प्रचलित असलेल्या देशांतील व्यापाऱ्यांना पैसे द्यावे लागत, त्या वेळी चांदीचा भाव उतरला असल्यामुळे रुपये जास्त जास्त द्यावे लागले व येथे माल महाग होऊं लागला. विशेषतः बाहेरून येणाऱ्या मालाबद्दल येथील व्यापा- ज्यांना जास्त पैसे द्यावे लागत व निर्गत मालाच्या व्यापाऱ्यांना त्यांच्या मालाबद्दल सोन्याच्या नाण्यांत जी किंमत येई तोच किंमत सोन्य च्या नाण्यांचे मोबदला रुपये घ्यावयाचे वेळीं ते रुपये जास्त मिळाल्यामुळे जास्त येई व त्यांचा फायदा होई. शेवटी १८९३ साली लोकांना टांकसाळी बंद झाल्या- वर व वस्तूंची किंमत सोन्याच्या नाण्यांत घेण्याचे ठरल्यावर हा हुंडणावळीचा भाव १ रुपयास १६ पेन्स असा स्थिर होऊं लागला.

 ह्या हुंडणावळीच्या प्रश्नाला महत्व येण्याचे दुसरे असे एक कारण आहे की, हिंदुस्थान सरकाराला दर वर्षी विलायतेस ' होमचार्जेस ' निमित्त ३१ कोट रुपये पाठवावे लागतात. पण विलायतेस हे रुपये चालत नसल्यामुळे साव्ह- रिन घेऊन तेथें भरणा करावा लागतो. तेव्हां हुंडणावळीचा दर जर कायम राहिला नाहीं तर स्टेट सेक्रेटरीला पाठविण्याकरितां बजेटमध्ये किती रक्कम मंजूर करावयाची हैं निश्चित करणे कठीण जाते; म्हणून हा हुंडणावळीचा भाव स्थिर असणे हिंदुस्थान सरकारास सर्वथैव श्रेयस्कर आहे. त्या ठिकाणी दुसरी एक गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे. ती ही कीं, इतर देशांप्रमाणे येथें हुंडणावळीचा भाव बाजारांत असलेल्या सोन्याचांदीच्या किंमतीवर किंवा आयातनिर्गत मालावरच सबैखी विसंबून रहात नाहीं; तर कधी कधी स्टेट सेक्रेटरी किंवा हिंदुस्थान सर- कार एकमेकांवर काढलेल्या हुंड्या विकण्याचे सुरू ठेवतात किंवा बंद ठेवतात व त्या मुळेहि तय हुंडणावळीच्या भावांत चलबिचल होत असते. विलायतेमध्यें स्टेट सेक्रेटरी स्वतःला लागणाऱ्या खर्चाची भरपाई करण्याकरितांच केवळ हुंड्या विकावयाला काढीत नाही, तर व्यापाराचे सोयीकरतां वाजवीहून जास्त हुंडया विकावयाला