पान:भारतीय चलनपद्धती.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०६
भारतीय चलनपद्धति.

भुदंड व निर्गत मालाला फायदाच होय. त्यामुळे असा परिणाम होत असतो कीं, आयात माल कमी कमी येऊं लागतो व निर्गत माल जास्त जाऊं लागतो व अशा तऱ्हेने आयात व निर्गत मालांच्या एकंदर किंमतीमधील फरक कमी कमी होत जातो.

 ६० 'गोल्ड पॉइन्टस्':- पण हुंडणावळीच्या भावाच्या चढउतारीला कांही मर्यादा आहे. हुंड्या विकत घेणे किंवा विकणे हा जो उद्योग व्यापारी लोक दलालाचेमार्फत करीत असतात त्यांत त्यांचा प्रधान हेतू असा असतो की, पोष्टानें पैसे पाठवून जो खर्च यावयाचा त्यापेक्षां ह्या तऱ्हेनें कमी खर्च होऊन थोडा फायदा पडावा. पण हाच दर जर सारखा वाढत चालला व जास्त पैसे पडूं लागले तर हुंड्या विकत घेण्यापेक्षां प्रत्यक्ष सोनेंच पाठविणें जास्त हितकर होईल; व लोक हुंड्या नविकत घेतां प्रत्यक्ष सोने पाठवूं लागतील. तेव्हां हुंड- णावळीचा दर वाढणें व उतरणें ह्याची मर्यादा एका देशांतून दुसऱ्या देशांत पाठविल्या जाणाऱ्या सोन्याबद्दल जो खर्च येतो त्यावर अवलंबून राहील. ह्याच मर्यांदांना इंग्लिशमध्यें ‘ गोल्ड पॅइंटस्' अशी संज्ञा आहे. ह्या मर्यादेला ज्या वेळ एखाद्या देशांत हुंडणावळीचा भाव येऊन पोचतो व त्यामुळे त्या देशांतून सोनें बाढेर जाऊं लागतें त्या वेळी त्या देशाला हुंडणावळीचा दर तोट्याचा असतो अशी म्हणण्याची चाल आहे. आतां असा प्रतिकूल दर असणे म्हणजे त्या देशला खरोखरच नुकसानीची बाब आहे अशांतला भाग नाही. पण अर्थ- शास्त्रामध्ये अशी परिभाषा ठरून गेली आहे एवढेच.

 (६१) हिंदुस्थानांत हुंडणावळीच्या प्रश्नाला आलेले महत्त्वः - आतांपर्यंत जें विवेचन करण्यांत आलेले आहे, ते जर बरोबर सम जलें असेल, तर हिंदुस्थानांत जी व्यापाराची उलाढाल होत असते व हुंडणा- बळीचा जो दर ठरत असतो, त्याबद्दल कोणालाही यथार्थ कल्पना करता येईल. त्या देशांत हुंडणावळीच्या प्रश्नाला फारच महत्व आलेले आहे. कारण सरकारचें चलनी नाण्याविषयींचें धोरण ह्या प्रश्नावरच अवलंबून आहे. त्याला अनेक कारणे आहेत. हिंदुस्थानांत अंतर्गत व्यापाराचाच विचार केला