पान:भारतीय चलनपद्धती.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्टेट सेक्रेटरीनें विकावयास काढलेल्या हुंडचा.

१०५



दर अशी संज्ञा आहे. हा दर कधी कमी होतो तर कधीं वाढत असतो. त्याला अनेक कारणे आहेत. पहिले कारण असे आहे की, जर एकच नाणें दोन देशांत प्रचलित असलें तर फारशी अडचण पडत नाहीं; पण जर त्या दोन देशांत भिन्न नाण प्रचारांत असली तर हुंडणावळीचा दर एक राहू शकत नाही. ही दोन नाणी जर एकाच धातूची असली तर त्या नाण्यामध्ये ज्या प्रमाणांत ती धातू असेल त्या प्रमाणावर हुंडणावळीचा दर अवलंबून राहील. उदाहरणार्थ, इंग्दिश सान्दरिनमध्यें निव्वळ सोनें ७,३२२३८ ग्रॅम आहे; व फ्रान्सच्या नेपो- लियन नांवाच्या नाण्यांत * निव्वळ सोने ५.८०६४५ ग्रॅम आहे म्हणून दोन देशांमध्यें हुंडणावळीचा दर १ इंग्लिश सान्दरिन= ७५३३२३४५२० फ्रँक= २५२२१५ फ्रँक आहे. तसेंच एकाया देशांत सोन्यानें वस्तूंची किंमत ठर विण्यांत येत असली व तेथें सोन्याचें नाणें प्रचलित असलें; व दुसन्या देशांत रुप्याच्या नाण्याचा प्रसार असला तर अशा वेळीं हुंडणावळीचा दर चांदीच्या बाजारांत असलेल्या किंमतीवर अवलंबून राहील. पण सर्वांत प्रबळ कारण म्हटलें म्हणजे हुंड्यांची मागणी व त्यांचा पुरवठा ह्यांचा परस्परसंबंध हे होय. बाजाराँत ज्याप्रमाणे वस्तूंच्या मागणीवर व पुरवठ्यावर किंमत अवलंबून असते; त्याचप्रमाणे हुंडगावळीचा दर हुंड्यांच्या मागणीवर व पुरवठ्यावर अव- लंबून राहतो; व ह्या हुंड्या अर्थात मालाच्या आयातीवर व निर्गतीवर अवलंबून असतात. ज्या देशांत निर्गतीपेक्षा आयात जास्त आहे त्या देशांत हुंडणावळीचा भाव चढलेला असतो; पण त्याच देशांत जर आयातीपेक्षां निर्गत वाढत असली तर तो हुंडणावळीचा भाव उतरूं लागतो. हा सामान्य नियम आपण लक्षांत ठेवला पाहिजे.

 एखाद्या देशांत हुंडणावळीचा भाव वाढतो त्याचा अर्थ असा होतो कीं, त्या देशंत बाहेरून आंत माल आणणाऱ्या व्यापायांना त्यांच्या अटकळीचे बाहेर आपल्या हुंड्यांबद्दल जास्त पैसे द्यावे लागतात; म्हणजे थोड्या शब्दांत सांगाव- याचें असेल तर हुंडणावळीचा वाढता दर हा आयात मालाला एक प्रकारचा


  • एक नेपोलियन म्हणजे २० फ्रँक होत.