पान:भारतीय चलनपद्धती.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०४
भारतीय चलनपद्धति.

पैसा न पाठविता मुंबईतील लोखंडी सामान खरेदी करणा-या व्यापायानें विलायतेत गहूं पाठविणाऱ्या व्यापाण्याची गांठ घेऊन जर त्याला पैसे भरल व त्याने विलायतेतील व्यापायावर काढलेली हुँडी घेऊन जर ती तेथील लोखंडी सामान पठविणाऱ्या व्यापयाकडे पाठवून दिली; तसेंच ही हुंडी घेऊन तो लोखंडी सामान विकणारा व्यापारी जर हिंदुस्थानचा गहूं खरेदी करणाऱ्या व्यापान्याकडे गेला तर त्याला ताबडतोब किंवा मुदत भरल्यावर पैसे मिळतील व दोनदां पैसे दोन ठिकाणी पठवयाचे असल्यामुळे लागणारा खर्चही वांचेल.

 त्या उदाहरणांत आपण दोन गोष्टी गृहीत धरल्या आहेत. पहिली गोष्ट अशी की, मुंबईचा व्यापारी जितक्या किंमतीचा गहूं पाठवितो तितक्याच किंमतीचे लोखंडी सामान विलायतेचा व्यापारी मुंबईच्या दुसऱ्या एका व्यापा- न्याकडे पाठवितो. दुसरी गोष्ट अशी कीं, व्यापारी एकमेकाला प्रत्यक्ष भेटून हुंड्याची अदलाबदल करतात. प्रत्यक्ष व्यवहारांत ह्या दोन्ही गोष्टी घडत नाहीत. नेहमी दोन देशांमध्यें सारख्याच किंमतीचा व्यापार होत नसतो. ज्या वेळी आयात मालाची किंमत निर्गत मालाच्या किंमतीपेक्षा जास्त असते त्य.वेळीं ज्या देशांत तो माल येत असेल त्या देशाला जास्त पैसे पाठवावे लागतात; व त्या देशांत व्यापाराची स्थिति सामान्यपणे समाधानकारक नाहीं असें मानण्यांत येतें. उलट त्याच देशांत आयात मालापेक्षां निर्गत माल जास्त किंमतीचा गेल्या कारणानें जर दुसऱ्या देशाकडून जास्त पैसे घ्यावयाचे असतील तर व्यापाराची स्थिति समाधानकारक आहे असे समजले जाते. त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांनी काढलेल्या हुंड्या गोळा करून विकणान्या व त्यावर नफा मिळविणाच्या पेढ्यासारख्या संस्था किंवा दलाल सर्व देशांत सांपडतात व त्यामुळे व्यापाऱ्याची सोय उत्तम तऱ्हेने झालेली आपण पहतो. इंग्लंड देश वगळला तर आपणांस असे दिसून येईल कीं, सर्व देशांत ह्या हुंड्या विकण्याचें काम पेढ्याच करीत असतात.

 (५९) हुंडणावळीचा दर म्हणजे काय ? - हुंड्यांची खरेदी- विक्री करितांना पेढया किंवा दलाल जी किंमत आकारतात तिला हुंडणावळीचा