पान:भारतीय चलनपद्धती.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्टेट सेक्रेटरीनें विकावयास काढलेल्या हुंडया.

१०३


 (५८) व्यापारी हुंड्या काढण्याची पद्धतः - एकाच देशांत दोन ठिकाणचे व्यापारी एकमेकांशी व्यवहार करितांना अर्वाचीन काळी प्रत्यक्ष नाण्याचा उपयोग थोडाच करीत असतात. पूर्वी ज्या वेळी व्यापाराची फारशी वाढ नव्हती व ज्यावेळीं दळणवळणाचे मार्ग कमी असत त्यावेळी मालाची खरेदी करतांना व्यापायांस रोख पैसे द्यावे लागत. व्यापार अगदी बाल्या- वस्थेत असतांना जिनसांनीं जिनसा घेण्याची पद्धत असे. पुढे व्यापार वाढत चालल्यावर पैशाचा उपयोग जिन्नस विकत घेण्याचे काम होऊ लागला; पण हल्ली व्यापाराच्या वाढीची पराकाष्टा झाल्यावर पुनः जिनसांनी जिन्नस विकत घेण्याची पद्धत प्रचलित होत आहे. विशेषतः अंतर्राष्ट्रीय व्यापार सुरू असतांना ही प्रवृत्ति स्पष्टपणे व्यक्त होत असते. प्रत्येक देशामध्यें जितका आयात माल येत असतो त्याची किंमत ज्या देशांतून तो येत असतो त्या देशांत आपला माल पाठवून तो देश देत असतो. हेच तत्त्व अगदी थोड्या शब्दांत जर सांगावयाचें असेल तर ' आयात मालाची किंमत निर्गत मालाच्या रूपाने देण्यांत येते' ह्या शब्दांत सांगता येईल. अशा रीतीने व्यापार सुरू झाला म्हणजे प्रत्यक्ष नाण्यांची जरूर फारच थोडी भासूं लागते.

 ज्या दोन देशांत व्यापार चालत असतो त्या देशांतील व्यापारी एक- मेकांवर हुंड्या काढीत असतात. आपण अशी कल्पना करूं की, मुंबई शहरांतील एक व्यापारी लंडन शहरच्या एका व्यापायस गव्हाची पोत पाठवितो. ह्या गव्हाच्या पोत्यांची किंमत ५ लाख रुपये आहे व ते सहा महेन्यानंतर मिळावयाचे आहेत. तसेच आपण आणखी अशी कल्पना करूं कीं, विलायतेमधील लोखंडी सामानाचे व्यापारी ह्यांनी मुंबईच्या दुसऱ्या एका व्यापाण्यास तितक्याच म्हणजे ५ लाख किमतीचे लोखंडी सामान पाठविले आहे व ह्या सामानाचे पैसेही सहा महिन्यांनींच मिळावयाचे आहेत. आतां ह्या उलाढालीत एका मुंबईच्या व्यापाण्याला लंडन शहरांतील एका व्यापाऱ्याकडून पैसे घ्यावयाचे असतात व दुसन्या उदाहरणांत दुमच्या मुंबईच्या व्यापान्यास लंडनमधील दुसऱ्या व्यापा-यास पैसे द्यावयाचे असतात. अशा वेळी प्रत्यक्ष