पान:भारतीय चलनपद्धती.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०२
भारतीय चलनपद्धति.

तरी ही संपत्तीच्या दृष्टीनें कोरडा ठणठणीत पडत चालला आहे. तसेच हा खर्च म्हणजे हिंदुस्थानच्या दास्याची खूणच आहे. कारण हा देश जर स्वतंत्र असता तर येथील विलायती नोकरांस जें पेन्शन विलायतेत मिळतें, किंवा हिंदुस्थानांतल्या रेल्वे वगैरेकारतां जे कर्ज विलायतेंत काढण्यांत येतें, व त्यावर भरभकम व्याज देण्यांत येतें, त्याप्रीत्यर्थ होणारा खर्च बराच कमी झाला असता; व जो कांहीं खर्च होत आहे तो येथेंच राहिला असता. हे जे मत आम्ही प्रकट केलेले आहे त्याला सर थॉमस मनरो व सर जार्ज विंगेट त्यांच्याही मताची पुष्टि आहे. आतां ही गोष्ट खरी आहे कीं, सर्वच खर्च कांही पेन्शन वगैरे देण्यांत होत नाही. ३० कोटी रुपयांपैकी फक्त १२ कोट रुपये ह्या पेन्शन किंवा फर्लोप्रीत्यर्थ खर्च होत असतात. पण हे नोकर जर एतद्देशीय असते तर त्यांना कमी पेन्शन देऊन हा खर्च कमी करण्यांत आला असता. त्याचप्रमाणे बाकींचे जे बावीस कोट रुपये खर्च होतात ते रेवेकरितां कर्ज काढल्यामुळें याव्या लागणाऱ्या व्याजाप्रीत्यर्थ किंवा इतर सामान घेण्याकरितां खर्च होतात. हेच सामान येथें घेतले किंवा हेच कर्ज सोन्याच्या नाण्यांत न काढितां रुपयांत काढिलें --फार काय, कर्ज काढून रेल्वेचा प्रसार करावयाच नाहीं असे जर हिंदुस्तान सरकारनें आपलें धोरण ठरविलें-तर हा खर्च बसच कमी होईल त्यांत संशय नाहीं. ह्या खर्चाबद्दल लागणारे रुपये पाठविण्याचा सरळ मार्ग म्हटला म्हणजे ते पोष्टानें पाठविणे हा होय. पण ह्या मार्गाचा अवलंब करण्यास दोन अडचणी आहेत. पहिली अडचण ही आहे की, हिंदुस्तानांत व विलायतेम यें एकच नाणें प्रचलित नाहीं. येथें वास्तविक १० आणे किंमतीची चांदी अस लेला पण कायद्याने १६ आणे किंमत ठरविलेला रूपया प्रचारांत आहे, तर विलायतेंत सोन्याच्या साव्हरिनचा प्रचार आहे. त्यामुळे येथून नोकरी संपल्या पर विलायतेस परत जाणारे गोरे अधिकारी आपले पेन्शन रुपयाच्या नाण्यांत स्वीकारीत नाहीत. दुसरी अडचण अशी आहे कीं, हा सर्व पैसा पोष्टानें पाठ- वायाचा म्हटले तर फार खर्चाचे काम होईल. तेव्हां हा सरळ मार्ग सोडून अन्य तऱ्हेनें हा पैसा विलायतेमध्ये पाठविण्यांत येतो. पण ही कोणची तन्हा आहे ते समजण्याकतितां थोडी अवांतर माहिती येथे सांगितली पाहिजे.