पान:भारतीय चलनपद्धती.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्टेट सेक्रेटरीनें विकावयास काढलेल्या हुंड्या.

१०१


मंडळाचा होणारा खर्च हिंदुस्थानच्या खजिन्यांतून होत असतो. त्या खर्चा- शिवाय इतरही पुष्कळ खर्चाच्या बाबी आहेत.

 (१) पहिली बाब म्हणजे हिंदुस्थानाकरितां स्टेट सेक्रेटरी कक्ष कधीं कर्ज काढीत असतो. त्या कर्जाबद्दल त्याला व्याज द्यावें लागतें. तसेच रेल्वे व पाठबंधारे त्यांच्याबद्दल दरसाल कांहीं रकम स्टेट सेक्रेटरीस द्यावी लागते; ह्या सर्व प्रीत्यर्थ होणारा खर्च
१७३ कोटी
१३ कोटी
१३३ कोटी
 (२) लष्करी खातें व मुलकीखातें ह्यांतील अधिकारी विलायतेंत फर्लो घेऊन गेल्यावर त्यांना तेथे मिळणारी रकम
 (३) सैन्य व कारभार या खात्यांतील लोकांप्रीत्यर्थ होणारा खर्च
 (४) नोकरीची मुदत संपवून हिंदुस्थानांतून विला- यतत गेल्यावर येथील वरिष्ठ नोकरींतल्या लष्करी व मुलकी कामगारांना मिळणाऱ्या पेन्शनादाखल वगैरे मिळणारी रकम.
 (५) हिंदुस्थानांतील मुलकी खात्याप्रीत्यर्थ विलायतेंत होणारा खर्च
 (६) हिंदुस्थानाप्रीत्यर्थं लागणाच्या मालांवर होणारा ह्या सर्व खर्चात इंडिया आफिसचा खर्च मिळविला असतां एकंदर खर्च
८ कोटी
२२ कोट
कोट रुपये
३०३ कोट रुपये

 त्या सर्व खर्चास 'होम चार्जेस' असे विशिष्ट नांव आहे. हा जो खर्च दर वर्षी होत असतो त्याबद्दल सुमारें 3 • कोट रुपये ह्या देशांतून बाहेर जातात. त्यामुळे हिंदु- स्थानास प्रत्यक्ष नाहीं तरी अप्रत्यक्ष खंडणीच द्यावी लागते. हा जो संपत्तीचा बार्षिक प्रचंड लोट विलायतेकडे अव्याहतपणे कित्येक वर्षे चालला आहे व पुढेही असाच चालणार त्यामुळे हिंदुस्थान एके काळी कितीही संपन्न असला