पान:भारतीय चलनपद्धती.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१००
भारतीय चलनपद्धति.

उपदेश लोकांस कसा पटणार ? इंग्लंडचा मोठेपणा व्यापाराचे बाबतींत तरी सोन्याचें नाण्यावर आहे. तो मोठेपणा आपणांस मिळावा म्हणून जर्मनीसारख्या राष्ट्रांनी आपल्या देशांत चांदीचे नाणे टाकून देऊन सोन्याचे नाणे सुरू केले. हिंदुस्थानाला मोठेपणा मिळविण्याकरितां जर सोन्याचे नाणें सुरू व्हावें अशो इच्छा झाली तर त्यांत नांवें ठेवण्यासारखें कांहीं नाहीं. सरकारला जर हिंदु- स्थानच्या लोकांची खात्री पटवून द्यावयाची असेल तर खुद्द इंग्लंडला रुपया- सारखें कृत्रिम नाणे आपल्या देशांत सुरू करण्यास सांगावें व मग येथील लोकांस गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डच्या उपयुक्ततेबद्दल गोष्टी सांगाव्यात. तसे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत लोक पुरुणांतली वांगी पुराणांतच असे म्हणणार.

भाग ९ वा.
स्टेट सेक्रेटरीनें विकावयास काढलेल्या हुंड्या.


 (५७) होम चार्जेस म्हणजे कायः - हिंदुस्थान में राष्ट्र जरी इंग्लंडने जिंकलेलें आहे तरी त्या देशाला सार्वभौमसत्तेबद्दल प्रत्यक्ष अशी खंडणी हिंदुस्थानास द्यावी लागत नाही. हिंदुस्थानांतले सर्व उत्पन्न हिंदुस्थानामध्येंच व हिंदुस्थानाच्याच कामाकरितां खर्च व्हावें असा पार्लमेंटचा स्पष्ट कायदा आहे. हिंदुस्थानचा राज्यकारभार येथील गव्हर्नर जनरल जरी पहात असला तरी तो कायद्यानें ब्रिटिश प्रधान मंडळातील एक सभासद असलेल्या स्टेट सेक्रेटरीला जबाबदार असतो. म्हणजे हिंदुस्थानचीं राज्यसूत्रे सर्वस्वी विलायतेमध्ये बसून स्टेट सेक्रेटरी हलवीत असतो. ह्या सेक्रेटरीला मदत करण्याकरितां व योग्य तो सल्ला देण्याकरितां १४ ते १८ सभासदांचें एक मंडळ असते व त्या सल्लागार