पान:भारतीय चलनपद्धती.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भारतीय चलनपद्धति.

भाग १ ला.
चलनपतीची मूलतत्त्वें
नाण्याविषयी सामान्य विचार.

 उपोद्धातः - हा विषय फार महत्त्वाचा आहे व ह्या विषयाचे सामान्य ज्ञान लोकांस होणे फार अगत्याचे आहे. पण वस्तुस्थिति अशी आहे कीं, चांगल्या शिकल्यासवरलेल्या लोकांसही ह्या विषयाची फारच थोडी माहिती असते. इतके गाढ अज्ञान लोकांत असण्या असे कारण दिसतें कीं, हा विषय शास्त्रीय आहे व त्यामुळे तो गहन आहे. पण अशी जरी वस्तुस्थिति असलो तरी हल्ली विद्या- प्रसार जास्त झाल्यामुळे लोकांची ज्ञानलालसा वृद्धिंगत होत आहे; व जगांत काय चालले आहे, वर्तमान काली जी राष्ट्र अग्रगण्य अशीं मानली गेली आहेत, त्याचें कारण काय असावें, हे जाणण्याची त्यांची उत्कट मनीषा आहे. अशा वेळीं ह्या चलनपद्धतींचा विचार लोकांपुढे मांडला असतां फायदेशीर होईल अशी आमची खात्री आहे.