पान:भारतीय चलनपद्धती.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सोन्याचें नाणे.

९९


नाहीं. पण स्टेट सेक्रेटरी व विलायतेचे व्यापारी हे सगोत असल्यामुळे हुंड्या अधिक विकल्या जातात व हुंडणावळीचा भाव कायम ठेवण्याची सरकारास घडपड करावी लागते.

 हल्ली हिंदुस्थानांत जी गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डची पद्धत आहे ती घढ ना घोडा ना गाढव अशा प्रकारची आहे. ह्या पद्धतींत मुख्य दोष असा आहे कीं, ती स्वाभाविक नाहीं व ज्या वेळी व्यापाराची तेजी असते त्यावेळी चलनी नाण्यांचाच प्रसार होतो. एकदां हा प्रसार फार झाला म्हणजे मंदीच्या वेळीं ह्रीं नाणी कमी न झाल्यामुळे किंमती विनाकारण वाढतात व त्यामुळे गिराई- कांचें नुकसान होतें. शिवाय गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डची आवश्यकता येथें नस- ल्याने लोकांचे अपरिमित नुकसान झालेले आहे. ज्या ठिकाणीं सोन्याचा पुरवठा फारसा नसतो त्या ठिकाणी ही पद्धति तुम्ही सुरू करा; पण जेथे सोनें मुबलक आहे व आयात मालापेक्षां निर्गत माल जास्त असल्यामुळे जेथे लोकांना सोनें मागण्याचा हक्क आहे तेथें तुम्ही सोन्यावें नाणें प्रचलित करून सोन्याचा उपयोग करूं देत नाहीं हा न्याय कोठला ? इतर सर्व सुधा- लेल्या राष्ट्रांत (चीन देश वगळून ) जर सोन्याचे नाणे सुरू आहे तर हिंदुस्थानांतच येथील व्यापायांच्या हातीत रुपये द्यावयाचे व विलायती व्यापाऱ्यांस तेवढी सोन्याची नाणी द्यावयाची हा उबड उघड अन्याय आहे. रुपयाची किंमत १६ पेन्स किंवा २४ पेन्स अशी कृत्रिम ठरविल्याने विलायती मालांस कृत्रिम फाजील मागणी येऊन येथील व्यापारास किंमती विनाकारण वाढल्यामुळे व मालास मागणी न आल्यामुळे, केवढा धक्का बसतो त्याचा अनु. भव लोकांस नुकताच आलेला आहे; व रुपयाची कृत्रिम किंमत कायम ठेवण्या- करितां ३५ कोटी रुपयांची ठोकर हिंदुस्थानास कशी बसलेली आहे हेही कोणास नवीन सांगावयास नको. सर्व नाण्यांचा विचार करतां सोन्याचे नाणें के हांदी सरस ठरेल. सोनें हें केव्हांही सर्वात जास्त किंमतीचे रहणार; त्यामुळे त्यावर लोकांचा नेहमीं विश्वास बसणार व व्यवहारांत देण्याघेण्याचे काम ते जास्त स्रोर्याचें असणार. तेव्हां इंग्लंडमध्ये लोक नोटांवरच बहुतेक व्यवहार करितात तसा येथे करून लोकांनी आपली तहान रुपयांवरच भागवावी असा खोटा