पान:भारतीय चलनपद्धती.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९८
भारतीय चलनपद्धति.

त्यामुळे व्यवहारांत सोन्याची व चांदीची नःणीं प्रचारांत येऊ लागली म्हणजे ग्रेशामच्या नियमान्वयें हलकी नाणी चांगल्या नाण्यांना हांकून देतात व रुप याचें हलकें नाणे म्हणजे कृत्रिम खोटें नाणे कायम राहून सोन्याचे नाणें अदृश्य होतें. ६ी जर आपत्ति टाळावयाची असेल तर त्याला खरा उपाय म्हणजे रुपयाचें नार्गे चिल्लर व दुय्यम करून सर्व भिस्त सोन्याच्या नाण्यावरच ठेवावी व तींच नाणीं सर्रास सुरू करावी. हल्ली सोन्यांची नाणी थोडी आहेत म्हणून ती सांठवून ठेशवीशी वाटतात. पण तींच जर मुबलक प्रचारांत असली तर ती लोकांस विशेष महत्वाची व टणार नाहीत. सोन्याच्याच नाण्याची गेष्ट कशाला ? महायुद्ध सुरू असतांना रुपये दुर्मिळ होऊं लागतांच ते सांठवून ठेऊन लोक कागदी नोटांवरच काम भागवूं लागले. तेव्हा सागावयाचें तात्पर्य एवढेच आहे की, सोन्याच्या नाण्यांचा प्रचार सरकाराकडून करण्यात आल्याबरोबर ती गुप्त संचित होतात ह्याचा दोष सरकाराकडेच येतो.

 वर दिलेले सरकारचें पहिले कारण वाचलें असतां आपणांस एक गोष्ट दिसून येईल की, सरकारची सर्व खटपट हुंडणावळीचा भाव कायम कसा राहील ह्याबद्दल असते. हिंदुस्थानांत कोणते नाणे सुरू केले असता लोकांचा फायदा होईल ह्या गोष्टीचा विचार न करता विलायतेच्या व्यापान्यांना येथे पैसे स्वस्त भावानें कसे पाठवितां येतील हीच गोष्ट सरकारात जास्त महत्त्वाची वाटते. सरकार सर्वज्ञ आहे; त्यास आम्ही सांगावे असे नाही. पण ज्या वेळी सरकार मुद्दाम जाणूनबुजून दुर्लक्ष करते त्यावेळी खरी गोष्ट व्यक्त करावी लागते. ही की, पैशाचे तीन प्रकारचे उपयोग आहेत. पहिला उपयोग असा आहे की, जिनसांची किंमत पैशाने ठरविली जाते. दुसरा उपयोग म्हटला म्हणजे ह्यावेळी एखादा जिन्नस विकत घेतला व त्याची किंमत कांदी कालाने द्यावयाची असली तर ती किंमत ह्या पैशाच्या रूपानें देता येते; तिसरा उपयोग म्हटला म्हणजे वस्तूंची अदलाबदल सुलभ करण्याचे साधन पैसा होय. तेव्हां सरकारने ह्या तिच्याच उपयोगावर नेहमी जोर देणे अनिष्ट आहे. हिंदुस्थान सरकारला स्टेट सेक्रेटरीला जे रुपये पाठवावयाचे असतात तेवढया- बद्दल स्टेट सेक्रेटरीनें जर हुंड्या विकावयास काढल्या तर आमची हरकत