पान:भारतीय चलनपद्धती.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सोन्याचें नाणे.

९७


आतां शिक्षणप्रसार वाढत आहे व व्यापारधंयाला साधनें जास्त अनुकूल असल्य मुळे लोकही आपले पैसे पोष्टांत किंवा पेढ्यांत ठेऊं लागले आहेत.

 पण सरकार असे म्हणते की, हे तुमचें म्हणणे आम्हांस कबूल आहे; पण येथील लोक गरीब आहेत ह्यांची वाट काय ? लोकांची प्राप्तीच जर थोड़ी आहे तर त्यांना सोन्याच्या नाण्याची जरूरी काय ? जितकी जास्त सोन्याची नाणी आणण्याचा प्रयत्न करावा तितक्याच प्रमाणांत ही नाणीं गडप होऊन पुनः रुपयेच प्रचारांत येतात ही गोष्ट खरी नाही काय? ह्यावर आमचें असे म्हणणे आहे की, लोकांना सोन्याची नाणी नकोत ही गोष्टच खोटी आहे. पूर्वी हिंदुस्थानांत सोन्याचे नाणे नव्हते व आतांच ते सुरू करावयाचे आहे असे थोडेंच आहे. फार प्राचीन काळापासून त्या देशांत सुवर्णांसारखी नाणी लोकप्रिय होतीं. ही प्राचीन स्थिति सोडून देऊन अर्वाचीन स्थितीकडे जरी आपण नजर फेंकली तरी आपण पाहतो की, दक्षिण हिंदुस्थानांत सोन्याच्या मोहरेचा फार प्रसार होता. न्या. रानडे हे एके ठिकाण म्हणतात की, हिंदु- स्थानांत १५० वर्षांपूर्वी मोंगली राजसत्ता व मराठी राजसत्ता सुरू असताना जर लोकांना सोन्याच्या नाण्याची संवय होती तर आतां पेढ्या देशांत व ढत असतांना व उद्योगधंदे व व्यापार त्यांची वृद्धी होत असतांना लोकांना रुपयेच झेंपतील व साव्हरिन झवणार नाहीत हे म्हणणे चुकीचे होईल. लोक गरीब आहेत तर १५ रुपयांचा साव्हरिन सुरू न करितां १० रुपयांचा व ५ रुप- यांचा अर्धा सान्दरिन सुरू करा. इंग्लंडमध्येसुद्धां चिल्हर कामांकरितां रुप्याच्या नाण्याचा उपयोग करण्यांत येतो व मोठ्या व्यवहारांत सोन्याच्या नाण्यांचा क नोटांचा उपयोग होत असतो तसाच प्रकार येथे होईल.

 सोन्याच्या नाण्यांचा संचय होऊन ती अदृश्य होतात त्यांचें खरें कारण असें आहे की, त्या देशांत मुख्य नाणे रुपयाचे आहे व दुय्यम नाणे साहरिक आहे. त्या दोन्ही नाण्यांची मूळ किंमत व कायद्यानें ठरविलेली किंमत जर सारखी असती तर फार चांगले झाले असतें. पण वस्तुस्थिति अशी आहे कीं, येथील रुपयाची १६ आणे किंमत ही कृत्रिम आहे व मूळ किंमत १० आणे आहे.