पान:भारतीय चलनपद्धती.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९६
भारतीय चलनपद्धति.

आण वें तितकें जास्त हे लोक तें जमीनीत पुरून ठेवतात किंवा दागिने वगैरे जिनसा करण्यांत फस्त करितात. वस्तुतः हा गुप्त संचय करण्याचा आरोप निर्मूल आहे. निदान त्यांत अतिशयोकि तरी फार आहे. ए. सी. चतज यानों एक ठिकाणी असे स्पष्ट सिद्ध केले आहे की, हिंदुस्तानांत अगणित गुप्त संचय अहे हो झूट बात आहे. वस्तुस्थिति पाहिली तर एवढेच म्हणता येईल कीं, दर माणसीं फार तर पांच रुपये सांठविले जात असतील. इतकेच नव्हे तर सरकार व तत्पक्षीय टीकाकर त्यांचा अंदाज स्वीकारला तरी दर माणसी २५ रुपयांहून ही संचयाची रकम जास्त होत नाहीं. इतर देशांत गुप्तसं वय करण्याची जी प्रवृत्ति दिसून येते त्या मानानें येथील लोकांची प्रवृत्ति फारशी गर्हणीय आहे असे वाटत न हो. एकंदर सर्व हिंदुस्तानांत सांठविलेली अतएव व्यापारांत न घातलेली रकम घेतली तर आपणांस असे दिसून येईल की, ह्या रकमेचा बहुतेक भाग राजेराजवाडे व जमीनदार लोक ह्यांच्या दागदागिन्यांत व सोन्याचांदीच्या भांड्यांतच गडप झालेला असतो व ह्याबद्दल सामान्य लोकांना जबाबदार धरती येत नाहीं. मनुष्यस्वभावच असा आहे कीं, डामडौल करावा, आपले वैभव लोकांस दाखवावें, व शरीर अलंकृत करावें; तेव्हां जगांतील इतर लोकांना वगळून फक्त हिंदुस्तानच्या लोकांस दोष देगें हा निव्वळ पक्षप त होय.

 हिंदुस्थानचे लोक आपल्या बायकांच्या अंगावर किंवा लहान मुलांचे अंगावर दागिने घालतात व अशा रीतीने रानटीपणाचें प्रदर्शन करितात असा त्यांचेवर पाश्चात्य लोकांचा आरोप आहे; पण हे दागिने म्हणजे एक प्रकारची ठेवच होय. प्रसंग पडला असतांना हे दागिने विकून चटकन् पैसे उत्पन्न करितां येतात. हिंदुस्थानचे लोकच दागिन्याचे पायीं लाखों रुपये खर्च करि- तात ही गोष्ट जरी खरी असली तरी पाश्चात्य लोक आपल्या बायकांचे चोचले पुरविण्याकरितां पैसे खर्च करीत नाहीत असें थोडेंच आहे. शिवाय आपण ही गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे कीं, एकेकाळी हा देश संपत्तीचे माहेरघर अस- ल्यामुळे व हल्लींच्यासारखी शांतता व सुरक्षितता त्यावेळी लोकांस नसल्यामुळे लोकांची प्रवृत्ति गुप्तपणे संचय करणे व दागिने करणें त्यांकडे साहजिकच होती.