पान:भारतीय चलनपद्धती.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सोन्याचे नाणे.

९५


 (२) हिंदुस्तानांत काय किंवा इंग्लंडमध्ये काय लोकांचे उद्योग- धंद्यांतले व्यवहार सोन्याचे साहाय्याने फारच थोडे होत असतात. हेच व्यवहार जर स.न्यांत करावयाचे असतील तर त्याचा असा परिणाम होईल की, त्यामुळे रुपये व चलनी नोटा ह्या मागे पडतील. वस्तुतः पाहिले असतांना नोटा चलनाचे व बापरण्याचे काम फार सोयीच्या आहेत व त्या जर मागे पडत चालल्या तर लोकांची फार गैरसोय होईल.

 (३) काही लोकांचे असे मत आहे की, ज्या देशांत सोन्याचे नाणे प्रचारति असतें त्या देशाला जगाच्या बाजारपेठांत मोठा मान असतो. इंग्लंड मध्ये जर लढाईचे पूर्वी सोन्याचें नाणे सुरू होतें तर हिंदुस्ताननेंच काय घोडें मारतें आई? त्या विचारसरणीत दोन मुद्यांकडे दुर्लक्ष केलेले आहे. पहिला मुद्दा असा आहे की, इंग्लंडच्या चलनी पद्धतीत साहरिनचें फारसें महत्व नाहीं. इंग्लंडचें व्यापारी महत्व सोन्याच्या नाण्यावर अवलंबून नाही तर तेथे जिन- सांची किंमत सोन्यामध्ये ठरविण्यांत येणें; विस्तृत प्रमाणांत पेढयाची पद्धति सुरू असणे; व पेढघांनी काढलेले चेक व बँक आफू इंग्लंडच्या नोटा त्यांचा प्रसार असणे ह्या गोष्टींवर ते महत्त्व अवलंबून आहे. ह्या गोष्टी लक्ष्यांत ठेवल्या असतां आपणांस असे दिसून येईल कों, सोन्याच्या नाण्याचा सरांस प्रसार केल्यापेक्षां जर सोनें सरकारी खजिन्यांत सांठवून ठेवलें तर तें जास्त फायदेशीर आहे. जेवढे सोनें दामिने वगैरेकरितां लागेल तेवढे विक्रीकरितां काढून बाकीचें सरकारी तिजोरीत किंवा पेढयांच्या खजिन्यांत सांठविण्यांत यावें व देशांतम्या देशांत लागणान्या पैशाचें काम रुपयांवर व नोटांवरच भागवावें होन शास्त्रशुद्ध पद्धति होय.

 (५६) वर सांगितलेल्या कारणांबद्दल चर्चा:- अशा प्रकारची विचारसरणि सरकार व तत्पक्षीय लोक हे नेहमीं स्वीकारीत असतात. पण थोडा सूक्ष्म विचार केला असता हो विचारसरणि किती फोल आहे हे चटकन समजून येईल. या लोकांचा मुख्य कटाक्ष असा आहे की, हिंदुस्तान चे कोक नेहमीं सोन्याचा गुप्त संचय करीत असतात. जितकें सोने जास्त प्रचारात