पान:भारतीय चलनपद्धती.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९४
भारतीय चलनपद्धति.

शकते. पण वस्तुस्थिति अशी आहे की, जितक्या जास्त प्रमाणांत सोन्याचे चा प्रचारात असतें तितक्याच प्रमाणांत हुंडणावळीचा भाव उतरत असतांना ही नाणी लोक दडपून ठेवतात व त्यामुळे त्या नाण्यांचा तो भाव कायम ठेव ण्याचे काम फारसा उपयोग होत नाहीं. चेंबरलेन कमिशन म्हणते की, ' अस- जसा सेन्याची नाणी लोकप्रिय करण्याचा सरकारने प्रयत्न करावा तसतसे लोक हीं नाणीं सांठवूं लागतात. विशेषतः ज्यावेळी व्यापारीविषयक आणीबाणीची वेळ असते व लोकांत विश्वास उडून जातो त्यावेळी ही नाणी साठविण्याची प्रवृत्ति स्पष्टपणे दिसून येते." जिनसांची अदलाबदल करण्याचे साधन म्हणून सोन्याचें नाणे रुप्याच्या नाण्यापेक्षा खरोखरच जास्त चांगले असतें. पण ह्याला एक मुख्य अट अशी आहे की, ह्या सोन्याच्या नाण्याचा उपयोग मेठमोठ्या रकमा देण्याचे काम विशेष होत असतो व ही देणीं नोटांचे द्वारा फिटण्या- सारखी नसतात. नियतिला व्यवहार हा नेहमींच रुपयांच्या द्वारा करावयाचा असतो व ज्यावेळी हुंडणावळीचा भाव उतरत असतो त्यावेळी तो थोपवून घर- ण्याकरितां हे रुपयेच उपयोगी पडत असतात. कारण सोन्याची नाणीं कांहीं बाहेर पाठविली जाणार नाहीत, तर रुपयेच बाहेर पाठवावे लागणार. सोन्याचा प्रसार जर जास्त प्रमाणांत करावयाचा असेल तर सुवर्णनिधि किंवा 'पेपर करन्छी- रिझर्व्ह मधील सोनें काढूनच करावा लागेल. व ज्यावेळी लोकांचा विश्वास उडून जातो त्यावेळी ह्या सोन्याचा फारसा उपयोग होणार नाही. कारण त्याची तूट त्यावेळी मासूं लागेल. लोकांना वारंवार लागणाऱ्या नवीन रुपयांच्या ऐवजी जर सोन्याच्या नाण्याचा उपयोग होऊं लागला तर हे नाणें सुवर्णनिधींतूनच काढावें लागेल व कृत्रिम रुपये पाडून होणाऱ्या फायद्यांतून सुवर्णनिधीची जो बाढ व्हावयाची तीस सरकारमा मुकावें लागणार. तात्पर्य, सोनें जर लहान प्रमाणात प्रचारांत असेल तर हुंडणावळीचा भाव उतरत असतांना त्याचा फारसा उपयोग नाहीं; व विस्तृत प्रमाणांत जर त्याचा प्रसार व्हावयाचा असेल तर सुबणनिधींतून किंवा पेपर करन्सी रिझर्व्हमधून तो करावा लागेल व आणी- बाणीचे वेळीं सोनें गडप होऊन दुर्मिळ होऊं लागल्यामुळे त्याचा फारसा उपयोग हुंडणावळीचा भाव कायम ठेवण्याचे काम होणार नहीं.