पान:भारतीय चलनपद्धती.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग आठवा.

-:-X●X-:-

सोन्याचे नाणे.


 (५५) सोन्याचें नाणें हिंदुस्तानांत सुरू न करण्या- बद्दलचीं सरकार पक्षीयांची कारणे:- आपण वर पाहिलेलेच आहे की, हिंदुस्थानांत मुख्य नाणें रुपयाचें आहे व विलायतेमध्ये ज्यावेळी तेथील व्यापायांस पैसा द्यावा लागतो त्यावेळी सोन्याचा उपयोग होत असतो; किंवा स्टेट सेक्रेटरीला विलायतेमधील आपल्या इंडिया कौन्सिलला लागणाच्या खर्चा- बद्दल जेव्हां पैसे लागतात तेव्हां त्याला ते साहरिनमध्ये मिळतात. हिंदुस्थानांत जी हल्लीं विलक्षण महागाई झाली आहे त्या महागाईचें एक असे मुख्य कारण अहे की, हिंदुस्तानांत हल्ली कृतिम रुपयाचा ( Token Coin ) प्रसार आहे. जगांतील प्रमुख देशांत सोन्याचें नाणें सरीस चालू असत हिंदुस्तानसारख्या देशांत- की ज्याला प्राचीन काळापासून सुवर्णभूमि अशी संज्ञा होती - सोन्याचे नाणे असणे फार जरूर आहे व तशी लोकांची फार दिवसांपासून मागणी अहे; पण विलायत सरकार व विलायतेचे व्यापारी त्यांच्या अप्रहामुळे ही मागणी पुरी होऊं शकत नाहीं. ह्या देशांत सोन्याचे नाणें की सुरू करूं नये ह्याबद्दल सरकार कारणे सांगत असते. ती कारणे कोणची आहेत त्याबद्दल आपण आतां विचार करूं.

 (१) सोन्याचें नाणें कां सुरू करावयाचें ? तर एकदा त्याचा असा प्रचार सुरू झाला म्हणजे लोकांची सांठवून ठेवण्याकडे जी प्रवृत्ति होते तो होणार नाहीं व बरेंच सोनें बाहेर काढण्यांत येईल व त्याचा उद्योगधंद्यांत उपयोग होईल. त्याचप्रमाणे चलनी नाणें अशा दृष्टीनें चांदीच्या नाण्यापेक्षां सोन्याचें नाणें अधिक उपयोगी असतें व आणीबाणीच्या वेळी तें हुंडणावळीचा भाव टिकवू