पान:भवमंथन.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९१ । - नव नवीं व्यसने. ups 1 दुव्र्यसनाचे सजीव पुतळे रोज दिसत आहेत, विपत्तीची कडेलोट झाली आहे, तरी मापले डोळे कोठे उघडत आहेत ! आपले आपण उमजतच नाहीं, म्हणून आपली दुर्दशा करून परदेशांतील तेजस्वी, कर्ते च पराक्रमी लोक अआपल्यावर अंमल करण्यास पाठविले म्हणजे तरी लाज वाटून त्यांचे रुद्रण झापण घेऊ म्हणूनच की काय वारंवार आपल्यावर परकी लोकांचा अंमल होत आला आहे. पण आपण पडलों पक्क निगरगट्ट, लांडोवृत्ति आणि विचारधि ! यामुळे आपल्यास परक्यांचे सद्गुण दिसत नाहीत. बुडत्याचा पाय खोलाकडे तसे होऊन आपण त्यांच्याकडे पाहतच नाही. त्यांच्या वाईट चालीरीति, त्यांची दुर्व्यसने ह्यांत मात्र त्यांच्यावर ताण आपण करतो. सांप्रत भूपृष्ठावर सर्वांत श्रेष्ठ अशा इंग्रज लोकांचा सहवास आणि छाया, ईश्वरकृपेनें आपल्यास प्राप्त झाली आहे. पण काय उपयोग ! ते दयाळूपणें आपलें विद्यामृत आपल्यास पाजीत अहेत! पण त्यापासून आपण काय कमाविलें आहे ? त्यांची श्ववृत्ति ( चाकरी ), कज्जेदलाली ( वकिली ), चार बाटल्यांची आषाढपाटी ( डिस्पेन्सरी ), पसरून बसणे, पोपटाप्रमाणे त्यांनी शिकविलेली लटपटपंची ( भाषणे ) त्यांच्या हेरांचे काम ( वर्तमानपत्रे ) लोकांच्या वर्गणीने पोट भरून फुकट करणे ह्याखेरीज कोणती कमाई केली आहे ? पारशी, भाटे तरी बरे, यांनी गिरण्या घालून एक तरी पाऊल पुढे टाकले आहे. नातां दुर्गणांची कमाई पहा ! आपल्या लोकांनी मद्यमांस खावे म्हणून त्यांनी स्कालशिपा ठे: वय नाहीत, बक्षिसे ठेविली नाहीत, चहाकाफी पिणास नोकरीची लालूच ठेविली नाही. पाच चिकटें खाणात किताब देण्याची योजना केली नाहीं. सारांश, त्यांच्यावर आपल्या सुन्यसनांचे टेपर ठेवण्याजोगे कारण त्यांजकडून झालें नाहीं. पण वरील सर्व वाईट पदार्थांचा प्रसार आमच्यामध्ये झपाट्याने वाढत आहे. आमची कोठे चहा उरली नाही म्हणूनच की काय कोण जाणे आह्लीं अपल्या चली आणि बायका ह्यास नेहमी चहा करण्यास लाविलें आहे. स्वराज्य गेले, त्याच्या बरोबर ऐश्वर्य गेले, सत्ता गेली, वजन गेले तेव्हां मातां बळ वाढवून रांडमास आणून काय करावयाचे, म्हणूनच की काय कोण जाणे,आम्ही बलवर्धन करणा-या दुग्धादिक रनिचाँचा संबंध ते इस टाकून शरीरप्रकतीचा नाश करण्याचा गुण असल्याविषयी डाक्टर लोकांचे दाखले घेऊन येणा-या चहाची आपले घरी मोठी चहा आम्ही करून ठेविली आहे. सुख व प्रतिष्ठित