पान:भवमंथन.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८६) करीत आहेत. ज्याची जीभ ताब्यांत नाहीं तो दुःखाच्या व विनाशाच्या मागाँस लागलाच समजावा. त्याच्या घरादारास पाय फुटलेच समजावे. दुष्काळाची आवृत्ति । नरासुरांच्या पोटाच्या धाडीचा परिणाम ह्या धान्यसंमृद्ध भरतखंडावर अति दारुण झाला आहे. दररोज लक्षावधि जनावरांची कत्तल होत असल्याकारणाने जनावरांच्या जीवावर अवलंबून असणारी शेतकी दुर्बळ झाली; निसत्व झाला. मेहनतीस बैल नाहीत, सत नाही. यामुळे वाढत्या लोकसंख्येस पोसण्यास भूमि समर्थ असून असमर्थ झाली आहे. वरचेवर दुष्काळाची आवृत्ति होत आहे. शक्ति-हासाचे कारण, हिंदी प्रजा ह्मणजे अगदी नादान, कमकुवत असा तिचा ठाम लौकिक झाला आहे. परद्वीपस्थ आपल्या तकनी नाना प्रकारची कारणे ह्या गोष्टीस सांगत आहेत. आमचे सांप्रतचे विद्वान लोक आमचे वैभव गेल्यानंतर ५० वर्षांनी जन्मलेले त्यांस पूर्वांची माहिती नाही. सर्व कांही ज्ञान परक्यांच्या पुस्तकावरून झालेले, स्वतःच्या पुराणादिकाकडे उढा नाहीं, मग माहिती कोठून व्हावी ? देशातील स्वाभाविक रचनेमुळे व हवेमुळे आम्ही कमकुवत व्यायाम नसल्याने आहों, वगैरे वाटेल ते जरी परक्यांनी सांगितले तरी माना डोलवाव्या, आम्ही मुळचेच नादान हो असे कबूल करावे, गोन्याच्या पुढे माम्द्वी यःकश्चित आहों, ही समजून व्हावी हे ठीकच आहे. पण ह्या शतकांतच नैसर्गिक कारणे उत्पन्न झाली नाहीत, ह्याच देशात अनेक नवनाथ सहस्रबळी होऊन गेले. पेशवाईअखेर सुद्धां लींच्या युरोपियनांस बगळेत मारण्याजोगे बलाढ्य लोक होते. एका दिवसांत पुण्याहून पंढरपुरास खांद्यावर जबरदस्त कढईचे ओझे घेऊन जाणारा दंडवते उपनावाचा ब्राह्मण पंढरपुरांत ३०/४० वर्षांमागे ही पाहिलेला आहे. उतारवयांत सुद्धा तो अनेक अनाथ प्रेते बगलेत मारून नेत असे. असे पुक्कळ लोक माझ्या ऐकण्यांत आहेत. त्यांची माहिती दिली असतां विस्तार फार होईल. सुमारे ४० वषा. पूर्वी ह्या डोळ्यांनी पाहिलेली माणसे व हल्लीचे मल्ल पाहिले म्हणजे सखे. दाश्चर्य वाटते. गेल्या साली राज्यारोहणाच्या वेळेस येथून नेलेले निवडक सैन्य पाहून तेथील लोक लज्जित झाले हे प्रशिद्धच आहे. यावरून आम्ही